Divya Nirdhar
Breaking News
student
पुणेमहाराष्ट्र

दहावीच्या निकालाची चिंता आहे?.. मग हे वाचा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता यंदा दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षा रद्द केल्यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार? हा प्रश्न सर्वांच्या मानत होता. या संदर्भात परीक्षेच्या मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत गुरुवारी (10 जून 2021 रोजी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रक जाहीर करत म्हटलं, सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) परीक्षा कोविड 19च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेली आहे. तसेच 28 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे.

त्यानुसार, आता शिक्षण मंडळाकडून मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना आणि वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. 10 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता शिक्षक आणि मुख्याध्यापकांना या कार्यपद्धतीच्या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

संबंधित पोस्ट

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला पर्यटन विकासाचा आरखडा

divyanirdhar

श्री लेमदेव पाटील महाविद्यालयमध्ये फायर एक्स्टिंग्विशरचे प्रशिक्षण

divyanirdhar

नाहरकत प्रमाणपत्रासाठी केली 50 हजारांची मागणी; सहायक नगर रचनाकार लाचेत अडकले

divyanirdhar

पदोन्नतीत अन्याय सहन केला जाणार नाही; गरजले राहुल घरडे

divyanirdhar

रात्री क्रिकेटचा सराव कसा करणार ?

divyanirdhar

बार्टी ः जातीचे नव्हे विकासाचे करा राजकारण

divyanirdhar