



नागपूर ः शेजारच्या बायकोची चटक लागलेला नवरा. संधी मिळाली की सोडत नव्हता. मग बायको माहेरी गेली तर त्याची चांदीच-चांदी. अशाच अमोल नावाच्या युवकाचे शेजारणीशी सूत जमले. चार महिने मस्ती केली. त्याचे फळही मिळाले. केलेल्या कामाचा घडाही भरला. मात्र नेहमीप्रमाणे मी तो नव्हेच या तोऱ्यात त्या युवकाने शेजारीण प्रेयसीला झटका दिला. चार महिने मौजमस्ती केल्यानंतर आपल्यालाच जिवे मारण्याची धमकी देत आहे, हे पाहून तिचा पारा चढला. ती पोलिसात गेली. पोलिसांनी हिसका दाखविताच आपण हे पाप केल्याचे त्याने कबूल केले.
लांडग्याला चटक लागली की कोणालाही सोडत नाही. अशाच एका पारडीत अमोल नावाच्या विवाहित तरुणाला शेजारच्या बायको सोबत लगट करण्याचा सवय लागली. मात्र, बायको घरी असल्याचे तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करताना अडचण होत होती. दरम्यान त्याची बायको काही दिवसांसाठी मोहरी गेली. आणि त्याला संधी मिळाली. जंगली श्वापदासारखा त्या शेजारणीवर तो तुटून पडला. पुढे काही बरे वाईट याचीही त्याला चिंता नाही. बायको माहेर गेल्याची संधी साधत त्याने वारंवार शेजारणीसोबत संबंध प्रस्थापित केले. मात्र त्याच्या या प्रेमप्रकरणाचे फलित फळाला आले. शेजारीण चार महिन्याची गर्भवती राहिली. आणि भडका उडाला. हा प्रकार शेजारणीच्या आईच्या लक्षात आला आणि दोघांचेही बिंग फुटले. लग्नाचे आमिष दाखवून त्या शेजारणीचा गेम केला. मात्र नंतर लग्नास नकार दिल्याने तिच्या आईने पोलिसात तक्रार दिली. आणि तो पोपटासारखा बोलू लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल हा भाजीपाला विकण्याचे काम करतो. त्याचे शेजारी राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीसोबत हिच्याशी सूत जुळले होते. तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. वारंवार संबंध प्रस्थापित करताना त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. मात्र त्यावेळी तिचे वय कमी असल्याचा थाप मारीत तो वेळ काढू लागला. मात्र तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणे सुरूच ठेवले. त्याने दरम्यान त्याने नातेवाईक असलेल्या युवतीशी लग्न उरकून टाकले. लग्नानंतरही त्याने तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. १ डिसेंबर २०२० ते १२ एप्रिल २०२१ दरम्यान अमोलची पत्नी माहेरी गेली होती. त्याने हीच संधी साधत युवतीला घरी बोलविले. तिच्यासोबत तो संबंध प्रस्थापित करू लागला. तरुणीच्या म्हणण्यानुसार आपल्या घरी बोलविले आणि बलात्कार केला. युवतीला दिवस गेले. ती चक्क चार महिन्यांची गर्भवती झाली. मुलीच्या आईने अमोलला विचारणा केली असता त्याने दोघाही मायलेकीला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून आरोपी अमोल यास अटक केली.
गर्भपाताचा प्रयत्न
अमोलला काही दिवसांपूर्वीच गर्भवती असल्याची माहिती त्या युवतीने दिली होती. मात्र, त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी चार महिन्यांचा गर्भ पोटात असल्याचे सांगताच अमोल घाबरला. त्याने गर्भपाताच्या गोळ्या आणल्या आणि तिला दिल्या. गोळ्या घेतल्यानंतर युवतीची प्रकृती बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
असे फुटले बिंग
युवतीने अमोल याला गर्भवती असल्याचे आधीच सांगितले होते. मात्र, त्याने लक्ष दिले नाही. एक दिवस त्याने तिला गर्भपात करण्याच्या गोळ्या दिल्या. त्या तिने खाल्ल्या. मात्र. यात तिची तब्येत बिघडली. आईने तिला दवाखान्यात नेले आणि तिथे गेल्यावर ती चार महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले. अशाप्रकारे त्याचे बिंग फुटले.