Divya Nirdhar
Breaking News
sontakke
नागपूरमहाराष्ट्रराजकीयविदर्भ

कोरोना रुग्णाचा उपचार मोफत करा : डी.डी. सोनटक्के

नागपूर : खासगी रुग्णालयाला लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य धोबी (परीट)समाज महासंघाचे(सर्व भाषिक) संस्थापक अध्यक्ष डी.डी. सोनटक्के यांनी केली.
कोरोनाचा राज्यात स्फोट झाला आहे. दररोज हजारोंवर रुग्ण निघत आहेत. मात्र, गरीब रुग्णांना वेळेवेळ उपचार मिळत नाही. त्यामुळे उपचाराविना त्यांचा मृत्यू होत आहे. शहर आणि ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असून गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना झाल्यानंतर उपचाराचे कोणतोही साधन नसल्यामुळे त्याच्यासमोर मृत्यूशिवाय कोणताही पर्याय नसतो. ग्रामीण व शहरी भागातील वस्तीमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कोरोना झालेल्या रुग्णाजवळ कोणाही जायला तयार नसतात. दुसरीकडे पैसा नसल्याने त्यांच्यावर चांगले उपचार करता येत नाही. त्यामुळे शासनाने राष्ट्रीय आपत्ती म्हणून आलेल्या या आजाराच्या रुग्णावर मोफत उपचार करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य धोबी (परीट)समाज महासंघाचे(सर्व भाषिक) संस्थापक अध्यक्ष डी.डी. सोनटक्के, रुकेश मोतीकर, दयाराम हिवरकर,भैयाजी रोहनकर,माणिकराव भोस्कर,अशोकराव क्षिरसागर, राजकुमार आवळेकर ,राजेश वाघमारे ,डॉ राजेश क्षीरसागर, आशिष निंबुरकर, प्रमोद बडनाग, पुरुषोत्तम लोखंडे, प्रदीप मदनकर, संजय क्षिरसागर, विलास नाकाडे, नीता मदनकर यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

नितीन गडकरी यांनी प्रशासनाला केले सावध म्हणाले, तिसऱ्या लाटेसाठी रहा सावध

divyanirdhar

खासगी वाहने घेण्यास संघटनेचा विरोध ; कामगार संघटनेचे परिवहनमंत्र्यांना पत्र

divyanirdhar

सहा महिन्यांपासून रेशनच्या धान्यासाठी वणवण…अधिकारी देतात हुलकावणी

divyanirdhar

उमरेडवासीयांना मिळणार शुद्ध पाणी; मुख्याधिकार्‍यांनी केली केंद्राची पाहणी

divyanirdhar

बदली रद्दच्या आदेशाने ग्रामसेवकांत नाराजी; आदेश मागे घेण्याची ग्रामसेवक संघाची मागणी

divyanirdhar

डॉक्टर म्हणतात, रुग्णालयातील संपले औषध, आणा बाहेरून

divyanirdhar