Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

सरकार बाराबलुतेदारांना उपाशी मारणार काय?, डी.डी. सोनटक्के यांचा सरकारला सवाल

नागपूर : सरकारने लॉकडाऊन जाहीर करताना ऑटो रिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले इत्यादी लोकांकरिता आर्थिक साहाय्य जाहीर केले. परंतु न्हावी, सुतार, शिंपी, कुंभार, परीट इत्यादी १२ बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक साहाय्य जाहीर केले नाही. त्यामुळे सरकार बाराबलुतेदारांना उपाशी मारणार काय?, डी.डी. सोनटक्के यांनी असा सवाल सरकारला केला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आपल्या देशात व संपूर्ण महाराष्ट्रातसुद्धा या कोरोना आजाराचे विक्राळ स्वरूप पहावयास मिळत आहे. राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तुंचे दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट, इत्यादी १२ बलुतेदारांमधील छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यामुळे आधिच गरीब परिस्थितीत असलेला हा समाज लॉकडाऊन मुळे अधिक जास्त आर्थिक अडचणीत आलेला आहे. एक प्रकारे या समाजावर उपासमारीची पाळी आलेली आहे. सरकारने लॉकडाऊन जाहीर करताना ऑटो रिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले इत्यादी लोकांकरिता आर्थिक साहाय्य जाहीर केले. परंतु न्हावी, सुतार, शिंपी, कुंभार, परीट इत्यादी १२ बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक साहाय्य जाहीर केले नाही.
राज्य सरकारने राज्यातील १२ बलुतेदारांबाबत सहानुभूती पूर्वक विचार करून १२ बलुतेदारांमधील परंपरागत व्यवसायिकांना प्रति कुटूंब किमान ५००० रुपये आर्थिक साहाय्य करावे ही विनंती व मागणी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार माननीय योगेशअण्णा टिळेकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात मा.जिल्हाधिकारी ,मा.उपविभागीय अधिकारी व मा.तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली.नागपूर शहर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनेसुद्धा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली आहे,
तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णाना वेळेवर बाबतीत बेड उपलब्ध होत नाही याकरिता कोविड केअर सेंटर मोठ्या प्रमाणात शहर व तालुका स्थानी सुरू करून कोरोना रुग्णांची व्यवस्था व उपचार कसे चांगले होईल याबाबत शासन स्तरावर प्रयत्न करावे अशी मागणी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आली.या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा चे सचिव डी.डी.सोनटक्के, विदर्भ संपर्क प्रमुख रवींद्रजी चव्हाण,नागपूर शहर भाजपा ओबीसी मोर्चा चे अध्यक्ष श्री.रमेशजी चोपडे,प्रदेश सोशल मीडिया सह संयोजक सुमित गाते, पूर्व नागपूर अध्यक्ष विजय बांगडे,महामंत्री तळवेकरजी व नागपूर शहर ओबीसी मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

बार्टीचे प्रशासन स्वच्छ करणाऱ्या धम्मज्योती गजभिये यांना बेकायदेशीरपणे केले पदमुक्त

divyanirdhar

‘ब्लू टीक’च्या नादात होईल घात; फेसबुक, इन्स्टावर दलाल सक्रिय

divyanirdhar

खरंच, आपण बौद्ध आहोत?

divyanirdhar

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ः महाविद्यालयावर कारवाईची राष्ट्रवादीच्या नेत्या सोनम उके यांची मागणी

divyanirdhar

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत; समर्थकांमध्ये जल्लोष

divyanirdhar

आरोग्य यंत्रणेत सरकार अपयशी ः देवेंद्र फडणवीस

divyanirdhar