Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

आमदार समीर कुणावार यांनी शहरवासियांना दिली अनोखी दिवाळी भेट

दिव्य निर्धार प्रतिनिधी
हिंगणघाट : स्थानिक तुकडोजी पुतळा ते टिळक चौक रस्त्याचे सौंदर्यकरण, मजबुतीकरण व रुंदीकरण इत्यादी विकासकामे पूर्ण करण्यात आल्यानंतर काल दिनांक  ०१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव सोहळ्याअंतर्गत या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.

०१ रोजी या लोकार्पण कार्यक्रमाचा नेत्रदीपक  सोहळा स्थानिक जयस्तंभ चौक येथे विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला आमदार समीर कुणावार यांनी शहराच्या विकासाचे ध्येय बाळगून कारंजा चौक,सुभाष चौक, विठोबा चौक ,टिळक चौक रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण केले. या रस्त्यावरील चौकाचे सौंदर्यीकरण सुद्धा केले.

आमदार कुणावार यांचे प्रयत्नातून सुमारे ३५ कोटी रुपयांच्या विशेष निधीच्या अंतर्गत हिंगणघाट शहरातील या प्रमुख रस्त्याची तसेच चौकांची विकासकामे करण्यात आली.  स्थानिक जयस्तंभ चौक चौकातील जयस्तम्भ हा स्वतंत्रता संग्रामाच्या काळातील शहीद स्वातंत्र्यसैनिकांची स्मृति जपणारा तसेच स्वातंत्र्याची  साक्ष देणारी वास्तू आहे, या चौकाचे विशेष सौंदर्यीकरण करीत काल नववधू सारखे दिवाळी पर्वावर सजविण्यात आले.तेथे अमर जवान शिल्प निर्माण करण्यात आले असून आमदार कुणावार यांनी माजी सैनिकांच्या उपस्थितित पुष्पचक्र अर्पण केले.


नागरपालिकेच्या वास्तुविशारद सौ.रुपाली मिटकर यांचे कल्पनेतुन येथे आई व बाळाचे सुंदर असे   वात्सल्य शिल्पसुद्धा उभारण्यात आले आहे. हलधर शेतकऱ्याची प्रतिकृती निर्माण करीत येथे अन्नदात्या शेतकऱ्यासही स्थान देण्यात आले आहे, पृथ्वीला गवसणी घालित शिक्षणाचा संदेश देणारी बालिका  शिल्प निर्माण केले आहे. नागपूर व अमरावती येथील शिल्पकारांनी या शिल्पांची निर्मिती केली आहे.       या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यीकरणासाठी तसेच विकासकामांसाठी जबाबदार  असलेले सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप कुटे,उपविभागीय अभियंता सतीश वाघ ,प्रशांत धमाने,पालिकेचे मुख्याधिकारी अनिल जगताप,वास्तुविशारद रूपाली मिटकर यांचेसह कंत्राटदार मायाजी तिवारी यांचाही सत्कार करण्यात आला. १ नोव्हेंबर रोजी स्थानिक जयस्तंभ चौकात संपन्न झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष प्रेम बसंतानी,माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा माजी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. उषाकिरण थुटे,माजी सैनिक संघटनेचे पुंडलिक बकाने,भाजपा जिल्हा महामंत्री किशोर  दिघे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला लोकार्पण सोहळ्याच्यावेळी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचाही अनेक संस्था संघटना तर्फे अभिनंदन अभिनंदन सत्कार करण्यात आला,या प्रभागाच्या नगरसेविका सौ.अर्चना जोशी, पंजाबी सेवा मंडळ तर्फे कश्मीर बत्रा,उद्योजक अजय करवा, गिमाटेक्सचे व्यवस्थापक शाकीर खान पठाण,कपडा व्यापारी असोसिएशनतर्फे विजय मुत्था तसेच व्यापारी संघाचे रोशन चंदानी यांनी हृदयसत्कार करण्यात आला,यावेळी पक्षाचे पदाधिकारी,स्थानिक नगरसेवक,मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.या सोहळ्याच्या वेळी शहरातील मुख्य मार्गावरती एलईडी  सिरीज लावून शहर प्रकाशमय करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे मंच संचालन प्रा.किरण वैद्य,प्रास्ताविक किशोर दिघे यांनी केले तर आशिष पर्बत यांनी उपस्थितांचे आभार मानले.  उपरोक्त कार्यक्रमानंतर स्थानिक  तुकडोजी पुतळा चौक येथील  Love my Hinganghat या प्रतिकृतीचेसुद्धा लोकार्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर,भाजपा शहरअध्यक्ष आशिष पर्बत,समाजसेवक सुनील डोंगरे,बालू वानखेडे,सोनू पांडे,राकेश शर्मा,तूषार वाईकर,दिनेश वर्मा यांच्यासह सर्व  पक्ष कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

राज्यात विकास करणारे नाही तर वसुली करणारे सरकार आहेः माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे टीकास्त्र

divyanirdhar

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्र होणार बंद

divyanirdhar

तृणमूलच्या गुंडगिरीविरुद्ध लढा देण्याचा निर्धार, नोकरीवरून काढून टाकलेल्यांना अर्थसाह्य

divyanirdhar

बार्टीचे प्रशासन स्वच्छ करणाऱ्या धम्मज्योती गजभिये यांना बेकायदेशीरपणे केले पदमुक्त

divyanirdhar

केंद्रीयमंत्री गडकरी म्हणतात, विकासाची जबाबदारी स्विकारा

divyanirdhar

शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी सामाजिक न्यायाचे सुमंत भांगे आक्रमक;आठवड्याला दिले बैठकीचे आदेश

divyanirdhar