Divya Nirdhar
Breaking News
kavle
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे शेतकरी अडचणी; जागोजागी बंधारे बांधल्याने नदीचे झाले नाले

नागपूर ः पाणी अडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून नदीवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. हेच बंधारे आता शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरू लागली आहेत. एकाच नदीवर ५० पेक्षा अधिक बंधारे बांधण्यात आल्याने नदीचे नाले झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याचा आरोप शेतकरी नेते राजानंद कावळे यांनी केला. त्यांनी यासंदर्भात राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना पत्र पाठवून हा प्रकार थांबविण्याची मागणी केली आहे.

ग्रामीण भागात दुष्काळी अवस्था राहत असल्याने त्यावर मात करण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार ग्रामीण भागातील नदीवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. यामुळे नदीचा प्रवाह ठिकठिकाणी अडविण्यात आला. त्यामुळे एका टोकाचे पाणी दुसऱ्या टोकाला जाणे बंद झाले. फक्त पावसाळ्यात बंधाऱ्यांचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले. त्यांनतर पाऊस जाताच बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्यात येतात. त्यामुळे नदीचा प्रवाह पूर्णपणे थांबविला जातो. यामुळे काही वर्षांपूर्वी नदी दिसत होती, त्या नदीला आता नाल्याचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी नदीत वाळू ऐवजी मातीच दिसून येत आहे. हा प्रकार संपूर्ण राज्यात दिसून येत असल्याने नदीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे कोल्हापुरी बंधारे उद्ध्वस्त करणे आवश्यक असल्याचे मत राजानंद कावळे यांनी व्यक्त केला आहे.

सरकारचे ब्रीदवाक्य ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ आहे. परंतु कोल्हापुरी बंधाऱ्याची अलीकडील स्थिती पाहता, कोल्हापुरी बंधारे नष्ट करा आणि शेतकऱ्यांचा नायनाट करा” असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. केवळ कुही तालुक्यातच नाही तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांची वाईट अवस्था पाहून पाणी कुठे मृत आहे आणि कुठे जिवंत आहे हे कळत नाही. पाणी अडवा पाणी जिरवा योजनेवर सरकार दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतो. तसेच कोल्हापुरी बंधारे बांधली जातात. हे बंधारे एकाच नदीवर ५० पेक्षा अधिक असतात.त्यामुळे नदीचा प्रवाह पूर्णपणे रोखला जातो.

काही बंधारे निकृष्ट असल्यामुळे बंधारे वाहून गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम तत्काळ रोखण्यात यावे, अशी मागणी राजानंद कावळे यांनी केली आहे.

ऐन शेती हंगामात ऑक्टोबर महिन्यात बंधाऱ्यामध्ये पाणी न साठवल्यामुळे बंधारे कोरडी पडली आहेत. याचा अर्थ सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे धोरण अंगीकारले आहे. या संपूर्ण परिस्थितीला लोकप्रतिनिधी पूर्णतः जबाबदार आहेत. कोल्हापुरी बंधारे गुणवत्ता पूर्ण असावेत व पाणी साठवणूक क्षमता सदैव कायम ठेवली जाईल, असे असावेत. तरच कोल्हापुरी बंधारे फायदेशीर ठरतील अन्यथा या योजना कुचकामी ठरतील. कुचकामी बंधारे तत्काळ उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे.

-राजानंद कावळे,शेतकरी व कामगार नेते

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद ः मलिंदा खाण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेची फाईल दडपली

divyanirdhar

‘ब्लू टीक’च्या नादात होईल घात; फेसबुक, इन्स्टावर दलाल सक्रिय

divyanirdhar

 घोटाळ्यात मनपा अधिकार्‍यांच्या सहभागाची शंका, राकाँच्या प्रदेश सचिव आभा पांडे यांचा आरोप

divyanirdhar

शिक्षकांनी ६ हजारांत घर कसे चालवायचे…राजानंद कावळे यांचा प्रश्न

divyanirdhar

अतिक्रमण हटविताना अडथळा, नगराध्यक्षांसह 13 जणांवर गुन्हे दाखल

divyanirdhar

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला पर्यटन विकासाचा आरखडा

divyanirdhar