Divya Nirdhar
Breaking News
abhay bang
नागपूरविदर्भ

मंत्री वडेट्टीवारांचा अजून एक गोंधळ निस्तरा : डॉ. बंग

जिल्हा प्रतिनिधी/दिव्यनिर्धार

गडचिरोली : जिल्ह्यातली दारू ७० टक्के कमी झाली असून ४८ हजार लोकांनी दारू पिणे बंद केले आहे. २०१९ मध्ये त्याचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सहा मंत्री व सहा सचिव सदस्य असलेल्या राज्य शासनाच्या कार्यगटाने गडचिरोलीचा हा यशस्वी पॅटर्न इतर दोन जिल्ह्यात लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता वडेट्टीवार राज्य सरकारच्या अधिकृत नीतीविरुद्ध जाहीर सूचना करतात, नक्षलवादग्रस्त जिल्ह्यात ते गोंधळ निर्माण करतात. हा गोंधळ दूर करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त करावे, असे आवाहन डॉ. बंग व डॉ. राणी बंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केले आहे.

लॉकडाउन उठविण्याविषयी अधिकारबाह्य घोषणा करून राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चार दिवस अगोदर अजून एक गोंधळ निर्माण केला आहे. चंद्रपूर पाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यातही दारूबंदी उठविण्यासाठी समिती नेमण्याची जाहीर सूचना २९ मे रोजी गडचिरोलीत करून त्यांनी दारूबंदी, आदिवासी व स्त्रियांचे हित आणि राज्य सरकारची भूमिका, या विषयी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या मनात संशय व गोंधळ निर्माण केला आहे. मंत्री वडेट्टीवारांचा हा गोंधळ अजाणता घडलेला नाही. त्यांना चंद्रपूरला वार्षिक एक हजार कोटी रुपयांचा व गडचिरोलीत पाचशे कोटी रुपयांचा दारू व्यापार उभारायचा आहे. त्यामुळे त्यांचा हा गोंधळ त्वरित निस्तरावा, अशी मागणी महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात दिलेल्या पत्रकात डॉ. बंग यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात १९९३ साली शरद पवार मुख्यमंत्री असताना लागू केलेली दारूबंदी आहे. येथील दारूबंदी ही केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत ‘आदिवासी भागांसाठी दारूनीती’ ला अनुसरून आहे. ‘दारू-तंबाखू नियंत्रण राज्यस्तरीय टास्क फोर्स’ अंतर्गत गडचिरोलीत जिल्हाव्यापी दारू-तंबाखू नियंत्रणाचा प्रयोग सुरू आहे. त्यासाठी ‘मुक्तिपथ’ ही संघटना निर्माण करून जिल्ह्यातील ११०० गावांनी दारूमुक्ती संघटना स्थापन केल्या आहेत. महिलांनी आपापल्या गावात २००० वेळा अहिंसक कृतीद्वारे दारू बंद केली आहे. १०५० गाव व पाच तालुक्यातील आदिवासी ग्रामसभा महासंघ यांनी दारूबंदीच्या समर्थनाचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठविले आहेत.

संबंधित पोस्ट

तो आपला घात करेल’…पाच जणांची हत्या करून केली आत्महत्या

divyanirdhar

भाजपच्या ओबीसी विभागाने दिला गरजूंना मदतीचा हात

divyanirdhar

राष्ट्रवादीचा शहराचा नवा गडी तयार, शहराध्यक्षपदी दुनेश्वर पेठे यांची नियुक्ती

divyanirdhar

शेतकरी, कामगारांचे आधारस्तंभ राजानंद कावळे आता राजोला जिल्हा परिषदेच्या मैदानात

divyanirdhar

कोरोना काळात लाखो लोकांना मिळाले हायजेनिक फूड ; उपायुक्त मिलिंद मेश्राम !

divyanirdhar

माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या दौऱ्याने कॉंग्रेसमध्ये उत्साह

divyanirdhar