



जिल्हा प्रतिनिधी/दिव्यनिर्धार
अमरावती ः छत्री तलाव परिसरा लगतच्या मोकळ्या जागेत ओली पार्टी करताना झालेल्या वादातून एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल असून अन्य तीन फरार झाले आहे.
अशोक उत्तम सरदार रा. जेवड नगर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशोक व त्याचे परिचीत छत्री तलाव परिसरात ओली पार्टी करीत होते. याच दरम्यान त्यांच्यात जुन्या कारणावरून वादावादी झाली. संतापलेल्या चौघांनी अशोक याच्यावर हल्ला करून मारझोड सुरू केली. याचकाळात त्यांच्या डोक्यावर दगडी फारीने प्रहार करण्यात आला. त्यामुळे अशोकला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्यानंतर हे परिचीत तेथून पळून गेले. त्या भागातून जाणार्याय एका व्यक्तीला अशोक रक्तबंबाळ स्थितीत दिसला.
त्याने काही नागरिकांना व त्यांनी राजापेठ पोलिसांना लगेच माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी लगेच फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणी सध्या जेवड नगरातल्या दोघांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. अशोक याच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. तो नेहमीच परिसरात दंबगगिरी करीत होता, असे सांगण्यात आले आहे. वैमन्सातूनच ही हत्या झाल्याचे पोलिस सांगत आहे. या भागात अलिकडच्या काळात हत्येच्या तीन घटना घडल्या आहे. बडनेरा हद्दीतही तीन दिवसापूर्वी एकाची हत्या झाली होती.