Divya Nirdhar
Breaking News
gadkari
नागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकीयराष्ट्रीयविदर्भ

केंद्रीयमंत्री गडकरी म्हणतात, विकासाची जबाबदारी स्विकारा

अमरावती : विद्यापीठाने आपल्या भौगोलिक परिसरातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी स्विकारल्यास खर्‍या अर्थाने त्या परिसराचा विकास साधल्या जाईल. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक, संशोधक व विद्यार्थांनी ही जबाबदारी उचलावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले.

आभासी स्वरूपात झालेल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सदतिसाव्या दीक्षांत समारंभामध्ये दीक्षांत भाषण करताना ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी, विशेष अतिथी म्हणून उदय सामंत, कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकर, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले, शिक्षण समाजपरिवर्तनाचे साधन असून संत गाडगे बाबांची शिकवण समाजापर्यंत विद्यापीठ पोहोचवत आहे. जेष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना विद्यापीठाने डी.लिट. देण्याचा प्रसंग ऐतिहासीक व आनंददायी आहे. अनाथ, दिव्यांगासाठी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्ची घातले असून समाजासाठी एक आदर्श प्रस्थापीत केला आहे. संत गाडगेबाबांनी सेवा, स्वच्छता व सामाजिक परिवर्तनामध्ये आदर्श घालून दिला आहे.

  त्यामुळे समाजसेवकांना ताकद देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे याची जबाबदारी विद्यार्थांनी घ्यावी. त्या कृतीतून खर्‍याअर्थाने त्यांच्यात सामाजिक जाणिव निर्माण होईल. देशासमोर अनेक प्रश्न आहेत. कोविडसह विविध क्षेत्रात आपल्याला संघर्ष करावा लागत आहे. देशाने अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून त्यातून राष्ट्रीय व सामाजिक पुनर्निर्माण होत आहे. तंत्रज्ञानाचा आधार घेवून सामाजिक विकास साधण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील घटकांनी पुढे येण्याची गरज असून सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठाने एक ब्ल्युप्रिंट तयार करावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

 विद्यापीठानेे लोणार सरोवर संशोधनाची जबाबदारी घेतली असून अमरावती हा विभाग मॅनमेड फायबरचे केंद्र आहे, येथे संत्र्याच्या बागा आहेत, शेतकर्‍यांचे उत्पन्न व जी.डी.पी. वाढविण्याची जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी. येथील प्राध्यापकांनी पेटेंट घेतल्याचा आनंद आहे. टेक्सटाईल इंडस्ट्री या भागात आहे. कापड तयार करण्यासाठी लेनिन आवश्यक असून ते विदेशातून आयात करावे लागते. लेनीनचे झाड याभागात लावण्यासाठी व त्यातून उत्पादन घेण्याची जबाबदारी कृषी संशोधकांनी घेण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. याशिवाय शेतीतील उत्पादन वाढावे, यासाठी काय करता येईल, त्यादृष्टीने विकासाचे ब्ल्यूप्रिन्ट देण्याचे काम संशोधकांनी करावे. त्यातून सर्वांगिण विकास साधल्या जाईल असेही ते म्हणाले. सर्व पदवीकांशी, आचार्य पदवीधारक व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांचे अभिनंदन करुन त्यांनी शुभेच्छा दिल्या. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने प्रगती केली आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित पोस्ट

सरकार काय मेल्यावर पैसे देईल़, रमाई घरकुल योजनेचा निधी आटला़

divyanirdhar

शिक्षकांनी ६ हजारांत घर कसे चालवायचे…राजानंद कावळे यांचा प्रश्न

divyanirdhar

पासपोर्टच्या धर्तीवर मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र; बार्टीने सादर केला सामाजिक न्याय विभागाला प्रस्ताव

divyanirdhar

राजकारणासोबतच प्रबोधनाची समाजाला गरज; अखिल तिरळे कुणबी समाज पदाधिकाऱ्यांचा चर्चासत्रात सूर

divyanirdhar

जीएसटी अनुदान महिन्याला १०८ कोटी ; मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांची माहिती

divyanirdhar

आमदार समीर कुणावार म्हणाले, तिसऱ्या लाटेसाठी, “ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन” मोहीम राबविणार

divyanirdhar