Divya Nirdhar
Breaking News
nana-patole
नागपूरमुंबईराजकीय

महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत़़़ नाना म्हणाले, पदोन्नती आरक्षणात विश्वासात घेतले नाही

मुंबई ः पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ राज्यघटनेच्याच साक्षीने घेतली आहे. पण ७ मे रोजी काढलेला जीआर हा बेकायदेशीरपणे काढण्यात आला असून तो तातडीने रद्द करण्यात यावा आणि राज्यातील रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी”, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.
राज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू असलेलं पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने ७ मे रोजी जीआर काढून एका झटक्यात रद्द ठरवलं. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या पदोन्नती आरक्षण उपसमितीने हा अध्यादेश जारी केला आहे. मात्र, काँग्रेसनं या जीआरला तीव्र विरोध केला असून तो तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पदोन्नतीमधील रद्द करण्यात आलेलं आरक्षण हा मुद्दा आता सत्ताधाऱ्यांमध्येच तापला असून आघाडीतील भागीदार पक्ष या मुद्द्यावरून एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
याशिवाय, “२०१७पासून आधीच्या सरकाने देखील एकही आरक्षणाची जागा भरलेली नाही. यचा सगळ्या जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून भरण्यात याव्यात”, असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत.

काय आहे हा जीआर?
राज्य सरकारच्या शासकीय आणि निमशासकीय अशा पदांवर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पदोन्नतीमध्ये जातनिहाय आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पदोन्नतीमधील आरक्षणाविषयीच्या उपसमितीचे अध्यक्ष खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. या समितीने ७ मे रोजी हे आरक्षणच रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या जीआरमध्ये हे आरक्षण रद्द करून पदोन्नतीचा कोटा सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात देखील आव्हान देण्यात आलं होतं.

संबंधित पोस्ट

वकिली व्यवसाय नाही तर लढण्याचे शस्र; ॲड. सोनिया अमृत गजभिये ह्या वकिली व्यवसायात शिखरावर

divyanirdhar

रामदास आठवले यांच्या वक्त्याचा राजानंद कावळे यांच्याकडून निषेध; धम्मात राजकारण करून वातावरण बिघडविण्याचा आठवलेचा प्रयत्न

divyanirdhar

…तर राजकीय संन्यास!; ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

divyanirdhar

कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे शेतकरी अडचणी; जागोजागी बंधारे बांधल्याने नदीचे झाले नाले

divyanirdhar

जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांत बंडखोरीः भाजपचा निधान, कॉंग्रेसचा ज्योती राऊत यांना धक्का

divyanirdhar

खासदार नवनीत राणांचे जातप्रमाणपत्र रद्द, उच्च न्यायालयाचा निर्णय…

divyanirdhar