Divya Nirdhar
Breaking News
नागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकीयविदर्भ

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर

नागपूर ः सर्वेाच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर ते कायम ठेवण्यात यावे, याकरिता भाजप नागपूर तालुका शाखेच्या वतीने बहादुरा फाटा येथे आंदोलन करण्यात आले. चक्काजाम आंदोलनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी बहादुरा फाटा,उमरेड रोड नागपूर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार अशोकजी मानकर,भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश सचिव डी. डी. सोनटक्के, भाजपा नागपूर जिल्हा महामंत्री अजय बोढारे, जिल्हा उपाध्यक्ष रुपरावजी शिंगणे, महिला आघाडी जिल्हा महामंत्री शुभांगी गायधने, भाजपा वैद्यकीय आघाडी नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रितीताई मानमोडे, तालुका अध्यक्ष श्री सुनील कोडे, जि.प सदस्य सुभाष गुजरकर,तालुका महामंत्री सचिन घोडे, पप्पू राऊत, राजकुमार वंजारी, बहादुरा ग्रामपंचायत सरपंच पुष्पाताई गायधने, उपसरपंच एजाज घानिवाला, भाजयुमो नागपूर तालुका अध्यक्ष हरीश कंगाली, तालुका महिला आघाडी अध्यक्ष डॉ. पूजाताई धांडे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष गणेश चुरड, भोला कुरळकर, रामराज खडसे, नरेश भोयर, बालू घोडमारे, नितीन शेळके, मनोज लक्षणे, कपिल आदमने, किशोर कुंभारे, विशाल शिमले, कमलाकर शेंडे, संजय भोयर,सुनील सोनटक्के,दिनेश डोंगरे, अभिजित वाघ,विजय नाखले, सोनू माकडे,रवी गायधने, दिलीप चाफेकर,सतीश यादव,राहुल गायधने, सुधाताई सेलोकर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

उमरेडवासीयांना मिळणार शुद्ध पाणी; मुख्याधिकार्‍यांनी केली केंद्राची पाहणी

divyanirdhar

मराठवाड्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजावर उच्च न्यायालयाचा दणका; लोणीकर यांची जनहित याचिका फेटाळून लावण्याची आरोग्य विभागाच्या मागणीला न्यायालयाची चपराक

divyanirdhar

नागपूरच्या आरोग्य सेवेत आठपटीने वाढ झाल्याचा पालकमंत्री राऊत यांचा दावा

divyanirdhar

बौद्ध अधिकाऱ्यांना टारगेट केल्यास देऊ चोप; आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे अध्यक्ष आर. एल. नंदागवळी यांचा इशारा

divyanirdhar

महानगर पालिकेची पोलखोल; तासभराच्या पावसाने नागपुरात दाणादाण

divyanirdhar

गोसेखुर्दचे `बॅक वॉटर’ शेतशिवारात; उभी पिके आली पाण्याखाली, शेतकऱ्यांची उडाली झोप

divyanirdhar