Divya Nirdhar
Breaking News
नागपूरराजकीयविदर्भ

ओबीसींचे आरक्षण कायम ठेवा;कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांच्या नेतृत्वात निवेदन

नागपूर ः कुही येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांनी केली. त्यांनी कुहीच्या तहसीलदारांनी निवेदन दिले.
यावेळी विविध विषयाची मागणी करण्यात आली. निवेदनामध्ये ओबीसींची जातिनिहाय जनगणना करा, मागासवर्गीयांचे पदोन्नतीबाबतचा ६ मे २०२१ चा शासकीय आदेश रद्द करा, ओबीसीचे आरक्षण रद्द केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसींची जनगणना, आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र, भाजप सरकारने व तत्कालीन फडणवीस सरकारने आकडेवारी सादर केली नाही. त्यामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झाले, असा आरोप राहुल घरडे यांनी केला. आरक्षण रद्द होण्यास फडणवीस सरकार जबाबदार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेधही नोंदविण्यात आला.
विशेष म्हणजे १९९४ साली व्ही. पी. सिंग यांनी प्रधानमंत्री असताना मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून ओबीसींना राजकीय,सामाजिक व शैक्षणिक आरक्षण दिले आणि त्यांच्या प्रगतीची दारे खुले केली. मात्र २०११चे जनगणनेचा डेटा विद्यमान केंद्रसरकारकडे असूनसुद्धा सुप्रीम कोर्टाला दिला नाही. इम्पीरिकल डेटा केंद्र सरकारने उपलब्ध दिला नाही. त्यामुळेच ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले. यामुळे महाराष्ट्रातील ५६ हजार ओबीसीची राजकीय पदे प्रभावित झाली. असेही राहुल घरडे म्हणाले. याविरोधात जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष उपासराव भुते, बाजार समिती मांढळचे सभापती मनोज तितरमारे,अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष राहुल घरडे, उपसभापती महादेव जिभकाटे, माजी सभापती अरुण हटवार, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष सुनील किंदर्ले, देवीदास ठवकर,विनय गजभिये, संपत माटे, मोतीराम केदार, सचिन पुडके, उपसरपंच सुखदेव जिभकाटे,गणेश दुधपचारे,किशोर कुर्जेकर,आकाश लेंडे,मयूर तळेकर,रामेश्वर शेंदरे,सचिन घूमरे,परमानंद शेंडे,बाळू आंबोणे,राजू चौधरी,उमेश कावडकर,देवेंद्र लेंडे,राजू कळंबे,नाना सूर्यवंशी, पूनम वासनिक,शामराव ईटनकर,राजू येळणे, ब्रम्हानंद शंभरकर, गौतम शेंडे उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

झाडे लावणे व झाडे जगविणे काळाची गरज ः रामदास तडस़़; आधार फाउंडेशन द्वारा भव्य स्वरूपात वृक्षारोपण

divyanirdhar

भाजपला धक्का; कॉंग्रेसचा दणदणीत विजय

divyanirdhar

का केला वाघाने विशेष पथकावरच वाघाचा हल्ला… वाचा

divyanirdhar

1600 कोटी खर्च येणार, 10 एकरात सेंटर; पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

divyanirdhar

धोबी सर्वभाषिक महासंघाची कार्यकारिणी जाहीर; डी.डी. सोनटक्के यांनी पदाधिकाऱ्यांना दिले नियुक्तीपत्र

divyanirdhar

नागपूर मनपाचा खड्ड्यांवर कोट्यवधींचा खर्च,कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे नियोजन

divyanirdhar