नागपूर ः सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे आरक्षण रद्द केल्यानंतर त्याचे तीव्र प्रतिसाद आज जिल्ह्यात उमटले. भाजपने जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली. जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात जिल्हाभर हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ झालेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील तालुका ठिकाणी झालेल्या आंदोलनात भाजपचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवण्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा डाव हा हाणून पाडला जाईल आणि वेळ आल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी दिला. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व कुही येथे जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये ,डॉ शिवाजी संसारे, सुनील जुआर, बाळू ठवकर, कविता साखरवाडे, सभापती अश्विनी शिवणकर, उपसभापती वामन श्रीरामे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सावनेर येथे डॉ.राजीव पोतदार, सोनबाजी मुसळे, नितीन राठी, रामराव मोवाडे, दादाराव मंगळे. विजयराव देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. हिंगणा येथे आमदार समीर मेघे, संध्याताई गोतमारे,धनराज आष्टनकर, सुरेश काळबांडे, केशवराव बांद्रे, सतीश शहाकार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. मौदा आमदार टेकचंद सावरकर, संघटन महामंत्री किशोर रेवतकर, सदानंद निमकर, चांगोजी तिजारे , मुन्ना चलसानी, हरीश जैन, मुकेश अग्रवाल, अशोक हटवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेउमरेड येथे माजी आमदार सुधीर पारवे , डॉ.शिरीष मेश्राम, दिलीपराव सोनटक्के, भदोरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेरामटेक येथे डी.मल्लीकार्जुन रेडडी , विकास तोतडे, अविनाश खळतकर, अतुल हजारे, नरेंद्र बंधाटे, लक्ष्मण केणे, राजेश ठाकरे, प्रकाश वनडे, अशोक कुथे, कमलाकर मेंघर, राजेश कडू, सरोज चांदूरकर, वनमाला ताई चौरागडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.नरखेड येथे उकेश चव्हाण, मनोज कोरडे, शामराव बरई, सुनील कोरडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेकाटोल येथे चरणसिंग ठाकूर, संदीप सरोदे, प्रतिभाताई गवळी, योगेश चापले, दिलीप ठाकरे, जितेंद्र तुपकर, विजय महाजन यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेकळमेश्वर येथे रमेश मानकर, इमेश्वर यावलकर, दिलीप धोटे,स्मृती इखार, प्रकाश वरूडकर, धनराजची देवके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.नागपूर ग्रामीण येथे अशोकराव मानकर, अजय बोढारे, डी.डी. सोनटक्के यांच्या नेतृत्वात करण्यात आले. पाठशिवणी येथे अशोकराव धोटे, अविनाश खळतकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.कामठी येथे अनिल निधान, रमेश चिकटे, किशोर बेले, राजेश रंगारी यांनी आंदोलन केले.भिवापूर येथे आनंदराव राऊत,भास्कर इंगळे, सुभाष राऊत यांनी आंदोलन केले.