हिंगणघाट(वर्धा) : मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिगणघाट येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यात मनसेला गावागावात आणि घराघरांत पोचविण्याचा संकल्पही अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात करण्यात आला. वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी हे कार्यक्रम घेण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिव्यांग (अपंग) लोकांना पावसाचे कपडे (रेनकोट) देण्यात आले. तसेच महिला सेनेतर्फे अगदी गरीब मुलांना बूक, पुस्तके व चित्र काढण्याचे साहित्य देण्यात आले. तसेच वाहतूक सेनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. झोपडपट्टी भागातील महिलांना साडी वाटप करण्यात आले. तसेच शेतकरी सेनेतर्फे गरजू शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी उपयोगी असणारे प्लॅस्टिक व काही साहित्य देण्यात आले. विद्यार्थी सेनेतर्फे रिक्क्षाचालक व मजदूरांना छत्री वाटप करण्यात आले .
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, मनसे जिल्हा सचिव सुनील भुते, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष रमेश घंगारे,वाहतूक सेना जिल्हाउपाध्यक्ष बच्चू कलोडे, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल सोरटे,मनसे शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष जगदीश वांदिले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, रुग्णसेवा जिल्हाध्यक्ष उमेश नेवारे, दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, दिव्यांग सेनेचे उपजिल्हाध्यक्ष गोपाळ कांबळे,शहर अध्यक्ष राजू सिन्हा,मनविसे तालुका अध्यक्ष शेखर ठाकरे,जितेंद्र भुते, नरेश चिरकुटे, अमोल मुडे, नितीन भुते, प्रसिद्धी प्रमुख जिल्हाध्यक्ष राजू मुडे, प्रशांत एकोणकर, किशोर भजभुजे, दीपक चांगल, परम बावने, अरविंद ठाकरे, अनिल भुते, सुनिल खेकारे,किशोर पांडे,प्रशांत कुठे,गोलू भुते, हरीश वाघ, दिनेश पिसे,अजय वाघ,निखिल ठाकरे,मिथुन नकाते, महिला सेना जिल्हा अध्यक्ष नीता गजभे, उपजिल्हा अध्यक्ष संगीता घंगारे, तालुका अध्यक्ष सुचिता सातपुते, शहर संघटक सीमा तिवारी, शहर अध्यक्ष शीतल गेडाम, शहर अध्यक्ष किरण माशालकर,तालुका सचिव सविता भजभूजे,साधना सावरकर, चंदा साठोने सर्व मनसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते