Divya Nirdhar
Breaking News
नागपूरमहाराष्ट्रराजकीयविदर्भ

आशा स्वयंसेविकांनी घेतली ‘मनसे’ कडे मदतीची धाव, मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले यांना दिले निवेदन

हिंगणघाट (वर्धा ) ः आशा सेविकांच्या प्रश्नावर सरकार लक्ष देत नसल्याचे लक्षात येताच आशा सेविकांनी मनसेकडे धाव घेतली. जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांना निवेदन देऊन विविध विषयांवर चर्चा केली. तर अतुल वांदिले यांनी सरकारने आशा सेविकांच्या समस्या सोडविल्या नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

 आशा स्वयं सेविका व गट प्रवर्तकांच्या अद्यापही सोडवणूक न झाल्याने आशा स्वयंसेविकांनी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या कडे घेतली मदतीची धाव व निवेदन दिले. आशा स्वयं सेविका व गट प्रवर्तकांचा विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप सुरू असून आशा स्वयंसेविकांच्या कामबंद आंदोलन जिल्ह्यात सुरू आहे. यामुळे आज आशा स्वयंसेविका यांनी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात विविध प्रकारच्या १५ मागण्या आहेत शासनाने आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा द्यावा, मानधनात वाढ करावी, आरोग्य विभागाचा नोकर भरती त आशा स्वयंसेविकांना प्राधान्य द्यावे, त्यांचे कामाचे तास कमी करण्यात यावी, अशा अनेक मागण्या शासनाने मान्य करावा, यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांना निवेदन देण्यात आले.

संबंधित पोस्ट

हे शैक्षणिक धोरण नव्हे विद्यार्थ्याचे मरण; राजानंद कावळे यांचा आरोप

divyanirdhar

येणार तर कमळच, भाजप युवा नेते चंद्रशेखर राऊत यांचा दावा

divyanirdhar

शेतकरी प्रश्नावर कृषी सभापती आमधरे यांनी शरद पवारांकडे का केली विनंती…वाचा

divyanirdhar

महानगर पालिकेची पोलखोल; तासभराच्या पावसाने नागपुरात दाणादाण

divyanirdhar

महापारेषण कंपनीकडून कोरोना उपाययोजनांसाठी निधी; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून धनादेश सुपूर्द

divyanirdhar

साहित्य विचारमंचच्या कवी संमेलनात श्रोते मंत्रमुग्ध

divyanirdhar