Divya Nirdhar
Breaking News
खेळठळक बातम्यानागपूरविदर्भ

रिटायर्ड आर्मी ऑफिसर अविनाश मेश्राम मागासवर्गातील युवकांना देतोय ऍथलेटिक होण्याचे मोफत धडे !

नागपूर ः बहुजन, दलित, आदिवासी समाजातील भारताचे प्रतिनिधित्व करणारे ऍथलेट तसेच नगण्यच. भारतीय स्पोर्ट, ऍथलेट क्षेत्रात पांढरपेशी वर्गाचे प्रतिनिधित्व मोठ्या संख्येने आहे. पिटी उषा, कर्णम मल्लेश्वरी, विनोद कांबळी आणि असे काही मोजकेच बहुजन, दलित, आदिवासी समाजातील स्पोर्ट तसेच ऍथलेट आहेत ज्यांनी देशाचाच तिरंगा साता समुद्र पार फडकविला आहे. यावरून ये सिद्ध होते कि दलित, बहुजन समाजातील य युवकांमध्ये प्रचंड क्षमता असताना सुद्धा योग्य मार्गदर्शन आणि ट्रेनिंग नसल्यामुळे हा वर्ग भारतीय स्पोर्ट आणि ऍथलेट मध्ये मागे पडतो आहे.
विदर्भातील बहुजन समाजातील रिटायर्ड आर्मी ऑफिसर अविनाश मेश्राम कामठी परिसरात भोयर कॉलेज च्या मैदानात दलित, आदिवासी आणि बहुजन सामाजातील युवक / युवतींना ऍथलेट होण्याचे मागील दोन वर्षांपासून मैदानी धडे गिरवीत आहे. कामठी नागपूर भागातील दलित, आदिवासी, बहुजन युवकांना एथलेट्स मध्ये सहभागी होण्याकरिता आपण जीवाचे रान करू असा आशावाद रिटायर्ड आर्मी ऑफिसर आणि फोर्सस अकॅडेमी चे प्रमुख अविनाश मेश्राम यांनी सांगितला आहे.
मेश्राम पुढे म्हणाले कि मागील २ वर्षांपासून २ वर्ष ते १८ वर्षांपरेंत दलित, बहुजन, आदिवासी, गरीब वयोगटातील सामाजातील युवक युवती ना मोफत प्रशिक्षण देतोय. माझे एकाच ध्येय आहे कि जसे पिटी उषा, कर्णम मल्लेश्वरी, विनोद कांबळी इत्यादींनी देशाचा तिरंगा साता समुद्र पार फडकविला तसाची इतिहास माझ्या हातून ऍथलेट तयार होऊन रचला जावा असा मनोदय अविनाश मेश्राम यांनी व्यक्त केलाय. त्यांनी काश्मीर पासून तर कन्याकुमारी पॅरेण्ट भारतीय सैन्यात वेगवेगळ्या पदावर कार्य केले आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी मैदानी, बौद्धिक आणि इतर खेळाचा दांडगा अनुभव आहे.
कुठल्या कुठल्या ऍथलेट ची सध्या तयारी सुरु आहे या प्रश्नाला उत्तर देताना मेश्राम म्हणाले कि रनिंग, लॉन्ग जम्प, शॉर्ट जम्प, भाला फेक इत्यादी करिता मोफत प्रशिक्षण देत आहे.मेश्राम पुढे म्हणाले कि, शामली टेम्भूर्णे आंचल चव्हाण, आकांशा गुज्जर, शुभम भवसागर इत्यादी युवक / युवतींनी आर्मी सीआरपीएफ च्या कॅम्प मध्ये सहभाग नोंदविला आहे.शामली टेम्भूर्णे आंचल चव्हाण, आकांशा गुज्जर, शुभम भवसागर हे बहुजन समाजातील युवक म्हणाले कि सकाळी ६. ०० वा. भोयर कॉलेज कामठी इथे अविनाश मेश्राम धडे देतात. त्यात मैदानी खेळातील बारकावे, बौद्धिक अभ्यास, सातत्य, जिद्द, चिकाटी, धाडस इत्यादी कवायती २ तास सकाळी चालतात. ऍथलेट बनण्याचा प्रवास अतिशय लांब लचक असल्यामुळे सतत मोटिव्हेटेड राहण्याकरिता वेगवेगळ्या मोटिव्हेशनल स्पीकर, यशस्वी ऍथलेट्स च्या कहाण्या सांगितला जातात जेणेकरून आम्हाला निराशा येऊ नये.
मैदानी खेळात रनिंग, लॉन्ग जम्प, शॉर्ट जम्प, भाला फेक आणि बराच कवायतीचा यात समाविष्ठ आहे.अविनाश मेश्राम साधारण १०० युवकांना मोफत ऍथलेट्स चे ट्रेनिंग देत आहेत. युवकांना मैदानात येतात वार्म अप नंतर मोटिव्हेशनल स्पीच तसेच मैदानी एक्सरसाइज घेतला जातात.फिसिकल आणि बौद्धिक फिटनेस वर प्रचंड लक्ष दिला जाते असे मत शामली टेम्भूर्णे या युवतीने व्यक्त केले आहे.अविनाश मेश्राम यांच्या साथीला शार्वीय लक सुद्धा हातभार लावतात.ते उत्तम फ़ुटबाँल प्लेयर आहेत त्यांनी राज्य आणि देश पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे.दोन्ही पायांचे लिगामेंट ऑपरेशन झाले असताना सुद्धा रिटायर्ड आर्मी ऑफिसर अविनाश मेश्राम च्या ” कँधे को कंधा ” मिलाकार साथ देतोय. विदर्भातील बहुजन दलित आदिवासी युवकांना ऍथलेटिक मध्ये पाठविण्याचे माझे स्वप्न असून त्याकरिता मी स्वताचे आयुष्य झोकून देईल असा रिटायर्ड आर्मी ऑफिसर अविनाश मेश्राम यांनी व्यक्त केलाय.

संबंधित पोस्ट

उमरेडवासीयांना मिळणार शुद्ध पाणी; मुख्याधिकार्‍यांनी केली केंद्राची पाहणी

divyanirdhar

पैशाचा पडला पाऊस, हुबेहुब छापल्या शंभरच्या नोटा..

divyanirdhar

 घोटाळ्यात मनपा अधिकार्‍यांच्या सहभागाची शंका, राकाँच्या प्रदेश सचिव आभा पांडे यांचा आरोप

divyanirdhar

नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्यालयातून जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांचे छायाचित्र काढले

divyanirdhar

ग्रामसेवकांच्या प्रवासभत्त्यात वाढ कमी असल्याची खंत

divyanirdhar

बेरोजगारांच्या हाताला काम दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे यांचा संकल्प

divyanirdhar