Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकीयविदर्भ

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत; समर्थकांमध्ये जल्लोष

नागपूर ः माजी खासदार आणि विदर्भाचे दमदार नेते सुबोध मोहिते यांनी आज, दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला विदर्भात बळ प्राप्त झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. अवजड उद्योगमंत्री असताना मोहिते यांनी देशामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांना बळ दिले होते.

विदर्भातील झुंजार नेता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. कार्यकर्त्यांची नाळ त्यांच्या जुळली असून रामटेक मतदार संघासह त्यांनी रामटेक विधानसभा, हिंगणा, काटोल. वरूड, मोर्शीसह वर्धा जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. वर्धा मतदारसंघात कार्यकर्त्यांना जोडले असून रामटेक लोकसभा मतदार संघात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवसेनेमध्ये असताना त्यांचा लढाऊ बाणा अनेकांना माहीत आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांना रामटेक मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व केले. केंद्रात ते मंत्री असताना त्यांनी विदर्भातीलच नव्हे तर देशातील उद्योगाला चालना दिली. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे नाव देशात केले. त्यांनी विविध पक्षात काम केले आहे. मात्र, शरद पवार यांच्या कार्याला प्रेरित होऊन त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला. मूळचे शिवसैनिक असलेल्या मोहिते यांनी सेना, काँग्रेस, शिवसंग्राम त्यानंतर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना असा आजवर विविध पक्षात राजकीय प्रवेश केला. शिवसेनेत असताना ते अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री होते. मात्र, शिवसेनेत असताना त्यांनी वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी मध्येच खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रामटेक विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र थोड्याफार मतांच्या फरकाने ते पराभूत झाले होते. मात्र तिथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला हे विशेष.

एनटीपीसी प्रकल्पाचे शिल्पकार सुबोध मोहिते
केंद्रात अवजड उद्योगमंत्री असताना मोहिते यांनी एनटीपीसीचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प मौदा येथे खेचून आणला होता. या प्रकल्पात अनेक लोक काम करीत असून हा प्रकल्प उत्तमरीत्या सुरू आहे. या प्रकल्पामुळे विदर्भाला नवा प्रकल्प मिळाला.

विमानामुळे परिषदेची संधी होती हुकली
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना काँग्रेसने मोहिते यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यावेळी मोहिते नागपूरला होते. त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईला बोलवण्यात आले होते. तेव्हा त्यांच्याकडे पाच ते सात तासांचाच अवधी होता. मुंबईचे विमान उपलब्ध नसल्याने ते विमानाने पुण्याला रवाना झाले. तेथून ते चारचाकी वाहनाने मुंबई गाठणार होते. मात्र त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुण्यात होत्या. त्या दिल्लीला जाणार असल्याचे नागपूरचे विमान पुण्याला उतरण्यात विलंब झाला होता. त्यामुळे मोहिते यांची संधी हुकली होती.

प्रदीप कांबळे, राजेश मालपे, प्रदीप ठाकरे,खुशाल तांबडे, राजु कडु, पवन तिजारे, दशरथ ठाकरे, एकनाथ डहाके, संजय धोंगडे रोशन तेलंगे, प्रशांत डाखोळे यावेळी उपस्थित होते. त्यांनी मोहिते यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

संबंधित पोस्ट

माजी मंत्री बंग यांच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषद उमेदवारांनी राष्ट्रवादीतर्फे भरले अर्ज

divyanirdhar

महानगर पालिकेची पोलखोल; तासभराच्या पावसाने नागपुरात दाणादाण

divyanirdhar

नागनदीसह अनेक नाल्यांवर सुरक्षा भिंत नाही;बालक वाहून गेल्यानंतरही महापालिका झोपेतच

divyanirdhar

रिपब्लिकन पक्षाचे रिद्देश्वर बेले यांना विजय करा; जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांचे मतदारांना आवाहन

divyanirdhar

कॉंग्रेसचे दरवाढीविरोधात गोधनी येथे आंदोलन ; केंद्र सरकारचा केला निषेध

divyanirdhar

शिक्षकांनी ६ हजारांत घर कसे चालवायचे…राजानंद कावळे यांचा प्रश्न

divyanirdhar