नागपूर : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, ओबीसींचे राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत करा, ओबीसींची जातनिहाय जनगणना जो करेल ओबीसी समाज त्याच्या सोबत, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा, नवे पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देत ओबीसी समाजबांधवांनी तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरातील ओबीसी समाज एकवटला. ओबीसी समाजाची 2021 मधे होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करुन ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा, सुप्रीम कोर्टाच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने पुर्ववत करण्याकरीता समर्पित आयोगाची नियुक्ती करुन इम्पेरीकल डाटा गोळा करुन संकलित माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण लवकरात लवकर लागु करावे, 243 डी व 243 टी या घटनात्मक कलमान्वये घटनादुरुस्ती करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण 27% निश्चीत करा, मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येवू नये, क्रिमीलेयरची मर्यादा मागील चार वर्षांपासून न वाढल्याने ती वाढवा, ओबीसी कर्मचार्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण दया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, ठाणे, नाशिक, रायगड व पालघर अशा आठ जिल्ह्यातील कमी झालेले आरक्षण पूर्ववत करा, ऑल इंडिया मेडिकल कोटा मध्ये ओबीसींच्या कमी झालेल्या जागा पूर्ववत करा, ओबीसींचा बॅकलॉक त्वरित भरा, आधी जातनिहाय जनगणना करा व मगच रोहिणी आयोग लागू करा, व राज्यसरकारने मेगा नोकर भरती त्वरीत करावी, राज्य शासनाने एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा त्वरीत घ्याव्या, आदी अनेक मागण्यांसंदर्भात आंदोलन करुन केंद्र व राज्य सरकारांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात महासंघाचे केंद्रीय सहसचीव शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, सुषमा भड, रेखाताई बारहाते, कल्पना मानकर, सुभाष घाटे, राजकुमार घुले, शरयूताई तायवाडे, शकील पटेल, संजय पन्नासे, गणेश नाखले, वृंदा ठाकरे, ईश्वर ढोले, मंगला देशमुख, प्रवीण बावनकुळे, विजया धोटे, सुरेंद्र मोरे, मुस्ताक मंसुरी, राजेश रहाटे, पराग वानखेडे, नाना झोडे, परमेश्वर राऊत, यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, सर्व संघटना, सर्व जात संघटना सहभागी होत्या.