Divya Nirdhar
Breaking News
crime
गुन्हानागपूरविदर्भ

अतिक्रमण हटविताना अडथळा, नगराध्यक्षांसह 13 जणांवर गुन्हे दाखल

भंडारा : साकोलीत शासकीय कामात अडथळा करणे, अंगावर धावून येणे, शिवीगाळ करणे, अंगावर दगड भिरकावून धमकी देणे तसेच जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार साकोली पोलिस ठाण्यात केली. यावरून नगराध्यक्षांसह 13 जणावर गुन्हे दाखल करण्यात आले.
21 मे रोजी पंचशील वॉर्ड येथे हरीश एकनाथ पोगळे यांच्या घरामागील नालीवरील अतिक्रमण 24 तासांत काढावे, असे पत्र मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी गेल्या बुधवारी पाठवले होते. त्या संदर्भात शुक्रवारी मुख्याधिकारी स्वतः: जेसीबी घेऊन अतिक्रमण हटविण्यासाठी तेथे दाखल झाल्या. त्यावेळी नगराध्यक्षा धनवंता राऊत,डॉ. अजय तुमसरे, भोजराम कापगते, आदिनाथ नंदागवळी, नगरसेविका अनिता पोगळे यांनी शहरातील इतर ठिकाणी असलेले अतिक्रमण सोडून हेतुपुरस्सरपणे श्री. पोगळे यांचे अतिक्रमण का पाडता? असे विचारत वाद घालून अतिक्रमण काढण्यास अडथळा केला. यावेळी मुख्याधिकारी मडावी यांनी हातात हातोडा घेऊन अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अतिक्रमण धारक आणि मुख्याधिकारी यांच्यात पुन्हा वाद झाला. येथे अतिक्रमण काढण्यावरून मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांचे कार्यकर्ते यांच्यात शुक्रवारी वाद झाला. त्याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी नगराध्यक्षांसह इतर 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये नगराध्यक्षा धनवंता राऊत, नगरसेविका अनिता किशोर पोगळे, नगरसेविका लता खुशाल कापगते, डॉ. अजय देवराम तुमसरे, माजी सरपंच भोजराम धोंडूजी कापगते, हरीश एकनाथ पोगळे, विनायक छगन देशमुख, डॉ. अनिल परशुराम मारवाडे, प्रीती प्रकाश डोंगरवार, प्रखर रामनारायण गुप्ता, चंद्रशेखर पोगळे, अजय नंदागवळी, आदिनाथ नंदागवळी यांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्र होणार बंद

divyanirdhar

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

divyanirdhar

तीन हजारांवर माथाडी कामगारांना साडेपाच कोटींचा बोनस; सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांची माहिती

divyanirdhar

सर्वच प्रकारची दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा निर्णय

divyanirdhar

नाहरकत प्रमाणपत्रासाठी केली 50 हजारांची मागणी; सहायक नगर रचनाकार लाचेत अडकले

divyanirdhar

झाडे लावणे व झाडे जगविणे काळाची गरज ः रामदास तडस़़; आधार फाउंडेशन द्वारा भव्य स्वरूपात वृक्षारोपण

divyanirdhar