Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

राज्यात विकास करणारे नाही तर वसुली करणारे सरकार आहेः माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे टीकास्त्र

दिव्य निर्धार प्रतिनिधी

नागपूर ः  महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात असणाऱ्या भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या इतिहासात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला असून महाराष्ट्रातील सर्वोत्तम रस्त्यांचं जाळं परतूर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळेल देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात रस्त्यासह इतर विकास कामासाठी सर्वाधिक निधी मिळाला असून आता मात्र महाराष्ट्रात विकास करणारे नाही तर केवळ वसुली करणारे सरकार आहे अशी टीका भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली

मंठा तालुक्यातील केंधळी केदारवाकडी पेवा व ढोकसाळ या गावांना जोडणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याचा उद्घाटन प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप भैय्या गोरे उपसभापती राजेश मोरे पंचायत समितीचे उपसभापती नागेशराव घारे पंजाबराव बोराडे, संभाजी खंदारे गजानन देशमुख बीडी पवार विठ्ठलराव काळे उद्धव गोंडगे दत्तराव कांगणे  प्रसादराव बोराडे विलास घोडके निवास देशमुख प्रसादराव गडदे राजेभाऊ खराबे नारायण बागल डीगांबर बोराडे माऊली वायाळ नवनाथ खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आलेल्या भूमिपूजन यामध्ये केंधळी ता. मंठा ते हातवन ता.मंठा मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत ४.२०० किमी लांबीचा आणि ०३ कोटी १८ लक्ष रुपये किमतीचा महत्वपूर्ण डांबरीकरणाचा रस्ता, प्रमुख जिल्हा मार्ग १३ ते केदारवाकडी २.५०० किमी लांबीचा ०१ कोटी ८८ लक्ष रुपये किमतीचा डांबरीकरणाचा रस्ता, नलडोह – पेवा- खोराड सावंगी ४.०५० किमी लांबीचा ०३ कोटी ६० लक्ष रुपये किमतीचा तर शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग- ढोकसाळ ते आरडा तोलाजी ४.६०० किमी लांबीचा व ०२ कोटी ४० लक्ष रुपये किमतीचा डांबरीकरण रस्त्या चा समावेश आहे. सबका दिन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री पदावर असताना लोणीकर यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन या रस्त्याची मंजुरी मिळवली होती असेही लोणीकर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले

मागील पंचवार्षिक मध्ये मंत्रिपदाच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांचा संदर्भ या वेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी परतूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी भरभरून निधी दिला असल्याचे देखील लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

रस्ते विकासाच्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील मतदारसंघात सह जालना व परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी १४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला त्यामुळेच जालना व परभणी जिल्ह्यांमध्ये रस्त्यांचे जाळे आपण निर्माण करू शकलो असेही लोणीकर यावेळी आवर्जून म्हणाले परतूर विधानसभा मतदार संघात डांबरीकरणाच्या रस्त्याबरोबरच पाणीपुरवठ्याची योजना आणि 220 केवी 132 के व्ही 33 केव्ही च्या माध्यमातून मतदार संघात विजेचा जाळू निर्माण केला असून रस्ते वीज आणि पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे देखील लोणीकर यावेळी म्हणाले

कोरोना संकटाच्या काळात अनेक लोक घरात बसलेले असताना देखील जीवाची पर्वा न करता डॉक्टर पोलीस आरोग्य कर्मचारी यांच्यासह अनेक कोरोना योद्ध्यांनी काम केले परंतु राज्य सरकारने मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष केले असून अद्याप पर्यंत कोरोना संकटात काम करणाऱ्या लोकांना साधं आरोग्यकवच राज्य सरकार देऊ शकलेलं नाही अशी टीका देखील यावेळी लोणीकर यांनी केली विद्यमान राज्य सरकारने केवळ वसुली करणे हा एकमेव गोरखधंदा चालवला असून कोरोना काळात मृत्यू पावलेल्या लोकांचा आकडा देखील लपवण्यात आला असल्याचा आरोप लोणीकर यांनी यावेळी केला

राज्य सरकार केवळ केंद्रावर प्रत्येक गोष्ट ढकलण्याचा प्रयत्न करत असून स्वतः मात्र काहीही करायचे नाही अशी भूमिका ठेवत आहे त्यामुळे राज्यातील मागील पाच वर्षात सुरळीत झालेली घडी पुन्हा विस्कटून जात असल्याची टीका देखील यावेळी लोणीकर यांनी केली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून एकही रुपयाचे विकासाचे काम या लोकांनी केले नाही असा आरोप देखील लोणीकर यांनी यावेळी केला

यावेळी दत्ता खराबे शरद मोरे कैलास चव्हाण विलास घारे अरुण खराबे सोपानराव खरात जितू सरकटे माऊली गोंडगे राजू नरवडे कल्याणराव उबाळे किशोर हनवते अशोक राठोड गजानन शिंदे रामप्रसाद गिराम अरुण खरावे मधुकर मिरगे सुभाषराव बागल सोमेश घारे केशव घारे बळीराम कवळे बंडू कवळे बंडू बिडवे बापूराव कव्हळे अशोक आप्पा सोनटक्के कानोबा थोरात ओंकार वरणकर जनार्धन थोरात भगवानराव देशमुख भाऊसाहेब देशमुख भारत राठोड परमेश्वर शिंदे सोपान वायाळ महादेव वायाळ महादेव नानोटे गौतम वावळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

 

संबंधित पोस्ट

‘बार्टी’ : बाबासाहेबांच्या विचार व प्रसाराचे केंद्र

divyanirdhar

येणार तर कमळच, भाजप युवा नेते चंद्रशेखर राऊत यांचा दावा

divyanirdhar

रिपब्लिकन पक्षाचे रिद्देश्वर बेले यांना विजय करा; जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांचे मतदारांना आवाहन

divyanirdhar

खासदार प्रफुल्ल पटेलांची मध्यस्थी, धान खरेदीला येणार वेग

divyanirdhar

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला पर्यटन विकासाचा आरखडा

divyanirdhar

डॉक्टर म्हणतात, रुग्णालयातील संपले औषध, आणा बाहेरून

divyanirdhar