Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

आदिवासींच्या हक्कासाठी आजन्म लढा देण्याची यांनी केली तयारी…वाचा

दिव्य निर्धार प्रतिनिधी

नागपूर ः देशात आदिवासी बांधवाच्या हक्कासंदर्भात मोठी गडचेपी होत आहे. त्यांच्या अधिकाराचे हनन होत आहे. यावर कोणतेही सरकार फारसे लक्ष देत नाही. आदिवासी बांधव वेळोवेळी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आजन्म आंदोलन करेन, अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते राजानंद कावळे यांनी केली आहे. कुही येथे आदिवासींच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले.

kavle
kavle

गेल्या अनेक वर्षांपासूनचा त्यांचा आदिवासींसाठी लढा सुरू आहे. त्यांचे संविधांनिक हक्क मिळावे याकरिता हा लढा आहे. मात्र, शासन त्यांना न्याय देत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या आदिवासीबांधवांनी कुही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांच्या या सांविधानिक आंदोलनात नागपूर जिल्ह्याचे नेते आणि कुही-उमरेड-भिवापूर क्षेत्राचे शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे यांनी पाठिंबा दिला.

आदिवासींच्या सांविधानिक हक्क व अधिकारासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेला पाठिंबा देत कुही तालुक्यातील आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिले. विविध मागण्या निवेदन तहसीलदार बाबाराव तिनघसे यांना दिले. देशभरात आदिवासींवर होत असलेले अन्याय-अत्याचार बंद करावे आणि त्यांना सांविधानिक हक्क व अधिकार देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. या धरणे आंदोलनाला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राजानंद कावळे यांनी भेट दिली. तसेच आंदोलनाला संबोधित केले. या धरणे आंदोलनात सिद्धार्थ मेश्राम, धम्मपाल मेश्राम, सचिन सोयम,प्रकाश सिडाम ,कुंदाताई सिडाम, सविता उईके, अनुसया धुर्वे, लता इवनाते आदींसह तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.

संबंधित पोस्ट

मौद्याच्या नगराध्यक्ष कोण?, सामान्य माणसाला पडला प्रश्न

divyanirdhar

सामाजिक न्याय विभागात अनेक अधिकारी ९ वर्षांपासून एकाच विभागात

divyanirdhar

स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना आरक्षण कसं मिळालं? …वाचा

divyanirdhar

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर करणार – पंतप्रधान

divyanirdhar

वाचा… जादुटोण्याच्या संशयावरून निघाल्या तलवारी-बंदुका!

divyanirdhar

आरक्षणासाठीच नाहीतर उद्योगातील वाट्यासाठी लढा : डी.डी. सोनटक्के

divyanirdhar