नागपूर ः रामटेक लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि माजी मंत्री तसेच कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी कुही तालुक्यातील विविध गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी भेटी देऊन पक्ष बांधणीवर भर देण्याचे आवाहन केले. तर काही दिवगंत कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घेऊन सात्वन केले. त्यांच्यासोबत कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल घरडे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. मुकुल वासनिक यांनी उमरेड विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत त्यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणाने चर्चा केली. तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गावागावांमध्ये कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे. त्या कार्यकर्त्यांना बळ देणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर प्रत्येक नेत्यांनी कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. गावातील कार्यकर्ता ही कॉंग्रेसची खरी ताकद असल्याचे मत मुकुल वासनिक यांनी यावेळी व्यक्त केले.
सिल्ली येथे कॉग्रेसचे सरचिटणीस मुकुलजी वासनिक, माजी राज्य मंत्री तथा अध्यक्ष नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटी राजेंद्रबाबू मुळक, आमदार राजू पारवे यांनी कुही तालुक्यातील सहकार महर्षी दिवंगत नागोराव जिभकाटे यांच्या निवासस्थानी सांत्वना भेट दिली. जिल्ह्यातील राजकारणात आपला ठसा उमटवत नावलौकिक करणाऱ्या जिभकाटे परिवारातील पितापुत्रांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. नागोराव जिभकाटे यांच्यासह मुलगा राजेंद्र जिभकाटे यांचे कुही तालुक्यातील राजकारणात नाव होते. मात्र कोरोनामुळे घात झाला. दोन्ही नेत्यांच्या अचानक जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल घरडे, जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे सभापती नेमावली माटे, माजी सभापती अरुण हटवार, तालुका अध्यक्ष उपासराव भुते, बाजार समितीचे सभापती मनोज तितिरमारे, उपसभापती महादेव जिभकाटे, शहर अध्यक्ष विकास राघोर्ते, चंदाताई येळणे,संजय गांधी योजनेचे विनय गजभिये, पंचायत समिती सदस्या चंदाताई येळणे, वंदना मोटघरे, हरीश कढव, संदीप खानोरकर, मोतीराम केदार, सुनील किंदर्ले, राजू येळणे, बाबा पठाण, चेतन रेवतकर, मयूर हिरेखन, आकाश लेंडे, सुधीर पिल्लेवान, सत्यवान चवरे, गौतम शेंडे, परमेश्वर वाघमारे, हरिचंद्र रंगारी, गुरुदास केळझरकर, शेखर वंजारी, विनायक गेडेकर, उल्हास मेश्राम, राजू कांबळे, भैय्या उईके, आसाराम गेडाम, शिवा कंगाले, किशोर कुर्जेकार, जितू गिरडकर,गोपाल दिघोरे, हरीदास बुटे, रामदास वैद्य, रामकृष्णा डहाके उपस्थित होते.