Divya Nirdhar
Breaking News
खेळमहाराष्ट्र

रात्री क्रिकेटचा सराव कसा करणार ?

नागपूर :  मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने मैदानी खेळाच्या सरावास परवानगी शासनाच्या वतीने देण्यात आली. सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ९ अशा वेळेत खेळाडूंना सराव करायचा आहे. मैदानी खेळ कुठलाही असो सकाळी खेळाडूंना सराव करणे अगदी सोयीचेच जाते. परंतु क्रिकेटसारख्या खेळात सायंकाळी सराव कसा करायचा असा प्रश्न क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांपुढे उपस्थित झाला आहे.

कोरोना काळात सराव बंद असल्याने खेळाडूंचे बरेच नुकसान झाले आहे. खेळाडूंना स्वत:चे शरीर तंदूरुस्त ठेवणे, शारीरिक क्षमता वाढविण्यासह मानसिक आरोग्य देखील सांभाळावे लागले. सलग दोन वर्षांपासून स्पर्धाही पूर्णपणे न झाल्याने बरेचसे खेळाडू मैदानावरही उतरेले नव्हते. परंतु आता सरावासाठी परवानगी मिळाल्याने खेळाडू मैदानावर सराव करत आहे. मात्र शासनाच्या अजब निर्णयामुळे खेळाडूंपुढे प्रश्न निर्माण झाला असून सायंकाळी सराव करण्याची परवानगी दिली असली तरी त्याची वेळ चुकीचीच ठरत आहे.

 अंधार पडल्यावर मैदानावर सराव कसा करायचा, सरावादरम्यान जर खेळाडूंना कुठलीही इजा झाली तर जबाबदारी कोणाची असे असंख्य प्रश्न खेळाडू आणि प्रशिक्षकांपुढे उपस्थित झाले आहे. त्यातच क्रिकेट सारख्या खेळाचा विचार केला तर क्रिकेटपटू रात्री नेट प्रॅक्टिस कशी करणार हे न समजणारेच कोडं आहे. त्यामुळे बऱ्याच क्रिकेट क्लबने प्रकाशाची सोय नसल्याने सायंकाळचा सराव बंदच ठेवला असल्याचे दिसून येते.

 सरावाची सायंकाळची वेळ अयोग्य

कोरोनामुळे बरेच दिवस क्रिकेट बंदच होते. त्यामुळे क्रिकेट क्बलची परिस्थिती तशीही वाईटच आहे. आता कुठे क्रिकेटच्या सरावास परवानगी मिळाली आहे. परंतु यात सायंकाळी ६ ते ९ सरावाची वेळ दिली आहे. अंधार पडत असल्याने या वेळेत सराव होवूच शकत नाही. बीसीसीआयने यंदाच्या संपूर्ण हंगामाची घोषणा नुकतीच केली आहे. सायंकाळच्या सत्रातील वेळ पाहता मुलांनी खेळायचे कसे, सराव कसा करायचा हा प्रश्नच आहे. रुग्ण आणि मृतसंख्या सध्या नियंत्रणात आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंना सायंकाळच्या सत्रात सरावासाठी योग्य वेळ मिळावी अशी अपेक्षा एनसीए अकादमीचे संचालक माधव बाकरे यांनी व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

भाजप केला आरोग्य सेवक, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

divyanirdhar

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर

divyanirdhar

मुंबई झाली पुन्हा हवालदिल, पावसाचा कहर

divyanirdhar

युवकांनो नोकरी शोधताय, इथे आहे नोकरीची संधी..

divyanirdhar

पासपोर्टच्या धर्तीवर मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र; बार्टीने सादर केला सामाजिक न्याय विभागाला प्रस्ताव

divyanirdhar

ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मा. कांशीरामजी यांची कॉपी केली : नवनियुक्त बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार

divyanirdhar