Divya Nirdhar
Breaking News
vijay vadettiwar
ठळक बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीयविदर्भ

1600 कोटी खर्च येणार, 10 एकरात सेंटर; पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंंबई : पावसाचा अचूक अंदाज घेता यावा, अतिवृष्टीमुळे रेड अलर्टचा इशारा जनतेपर्यंत पोहोचवून नुकसान टाळता यावे आणि पीक नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना मोबादला देता यावा, यासाठी इस्त्रायलच्या धर्तीवर मिहानमध्ये 10 एकर जागेत अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केली.

विजय वडेट्टीवार रविभवनात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, यंदा 102 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु, मुंबई, कोकण वगळता इतर भागात पाऊस पडलेला नाही. भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात तर कमी पाऊस आहे. त्यामुळे त्या भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याचे अंदाज चुकत आहेत. त्यामुळे इस्त्रायलच्या धर्तीवर भारतातील सर्वात अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र मिहानमध्ये उभारण्यात येणार आहे. 10 एकर जागेतील हे केंद्र येत्या 5 ते 6 महिन्यात सुरू होणार आहे. यासंदर्भात प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून, यावर 1600 कोटी रुपये खर्च होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून मदत मागण्यात येईल. मध्य भारतासाठी हे केंद्र अत्यंत उपयोगी पडेल. हवामानाची अचूक माहिती मिळेल. किती वाजता पाऊस पडेल, किती वेळ पडेल, यासंदर्भात माहिती आधीच कळेल. त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यास शासनाला तशा उपाययोजना करणे सोयीचे जाईल.

 दरवर्षी अतिवृष्टी आणि पाऊस न पडल्यास पिकांचे नुकसान होते. पंचनामे केले जातात. परंतु, ते सदोष असतात. त्यामुळे खरे गरजवंत शासनाच्या मदतीपासून वंचित राहतात. या केंद्राच्या माध्यमातून पीक सर्वेक्षण करून शासनाला वेळेवर मदत करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काल मुंबईत पहाटेपासून अतिवृष्टी झाली. गेल्या 24 तासांत शांताक्रुज, चेंबूर परिसरात 234 ते 270 मिमी पाऊस पडला. चेंबूर, विक्रोळी, भांडूपमध्ये दरड कोसळून 21 लोकांचा मृत्यू झाला. अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतरही तेथील लोकांनी दुर्लक्ष केले. मृतकांना एफडीआरमधून 4 लाख तर मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख अशी पाच लाखांची मदत देण्यात येईल. तसेच ज्यांची घरे पडली आहेत, त्यांना 95 हजारापर्यंत मदत दिली जाईल. तातडीची मदत म्हणून 10 हजार व शिधा देण्यात येईल, अशी घोषणाही वडेट्टीवार यांनी केली.

नागपूर, चंद्रपूरला अत्याधुनिक बंब देणार

आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे आगीवर नियंत्रणासाठी 19 गाड्यांची खरेदी करण्यात आलेली आहे. एक वाहन 2 कोटी 60 लाखांचे आहे. हे वाहन अत्याधुनिक असून, आग लागल्यानंतर ज्या भागात गाडी जाऊ शकत नाही, त्यासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे. 200 मीटरपर्यंत पाण्याचा फवारा या बंबामार्फत करता येणार आहे. नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेला प्रत्येकी एक वाहन देणार असल्याचे वडेट्टीवार यांनी शेवटी सांगितले.

कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत विचार

भंडारा, गडचिरोली आणि मराठवाड्यातील अनेक भागात पाऊस पडला नाही. त्यामुळे त्या भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस लवकर न आल्यास या भागात कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

कॉग्रेसला बर्वे तर भाजप-शिवसेनेला पारवेची काळजी; साडे सहा लाख बौद्धांचा वाली कोण?

divyanirdhar

रामटेकच्या विकासासाठी किशोर गजभियेंना मतदान करा; प्रचार सभेत नेत्यांनी केले आवाहन

divyanirdhar

आशा स्वयंसेविकांनी घेतली ‘मनसे’ कडे मदतीची धाव, मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले यांना दिले निवेदन

divyanirdhar

जिल्हा परिषदेचा दावा फोल, पाणीटंचाईची कामे अपूर्णच

divyanirdhar

हिवाळी अधिवेशनात सावजी हॉटेलची विशेष क्रेझ

divyanirdhar

नागपुरात निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग कोसळला

divyanirdhar