Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सरपंच जयश्री इंगोले यांच्या खसाळ्यात उमलली ‘समृद्ध पंचायत’ची पहाट

दिव्य निर्धार वृत्त
नागपूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या शुभारंभानिमित्त खसाळा गावात आयोजित विशेष ग्रामसभा उत्साहात पार पडली. गाव विकास, स्वच्छता उपक्रम, महिलांच्या सक्षमीकरणापासून ते पर्यावरण संवर्धनापर्यंत अनेक उपक्रमांनी ग्रामसभा रंगतदार झाली. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ऑनलाइन उपस्थित राहिले, तर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी थेट ग्रामसभेचा अनुभव घेत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान व विशेष ग्रामसभा खसाळा गावात उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे हे ऑनलाइन पद्धतीने जोडले गेले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद नागपूरचे कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सरपंच जयश्री इंगोले, कामठीचे तहसीलदार जगदाळे, गटविकास अधिकारी येवले व विस्तार अधिकारी गावंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यकारी अधिकारी महामुनी यांनी ग्रामसभा प्रत्यक्ष अनुभवली. ग्रामस्थांसोबत थेट संवाद साधून गावातील विकासकामांची माहिती घेतली. त्यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा शुभारंभ झाला. या वेळी वृक्ष लागवडही करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासह गावाच्या शाश्वत विकासाला चालना देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. ग्रामसभेत गावकऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांनी वृद्धांचा वाढदिवस साजरा केला. यामुळे ग्रामसभेचे औचित्य अधिकच बहारदार झाले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटातील महिलांच्या उद्योगाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामविकासात महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सरपंच जयश्री इंगोले यांनी यावेळी करण्यात केले. सीईओ महामुनी यांनी गावातील विविध उपक्रमांची पाहणी करून कमी कालावधीत विकास साध्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. गावातील उपलब्ध संसाधनांचा योग्य उपयोग करून आदर्श विकास कसा साधता येईल याबाबत त्यांनी सूचना दिल्या. ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. खसाळा गावाने केवळ नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर आदर्श घालून द्यावा. गावाच्या प्रगतीचा हा प्रवास मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामुळे अधिक वेगाने पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सरपंच जयश्री इंगोले यांच्या कार्याचे कौतुक सीईओ विनायक महामुनी यांनी केले.

ग्रामपंचायतीअंतर्गत विविध विकासाची कामे केली. यामुळेच शासनाने पुरस्कृत केले. विकासासाठी निधी दिला. गावात स्मशानभूमीतील हरित आणि शांत परिसरामुळे आज त्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करतात. गावातील तरुणांसाठी अभ्यासिका, वाचनालय, सौरऊर्जा ग्राम अशा उपक्रमांवर भर देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात ऊर्जाग्राम म्हणून गावाची ओळख होईल. मुख्यमंत्री समृद्ध अभियानामुळे गावात विकासाची ऊर्जा निर्माण झाली आहे.
-जयश्री इंगोले, सरपंच, खसाळा

संबंधित पोस्ट

कामठीच्या विकासासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना विजयी करा, भाजपचे चंद्रशेखर राऊत यांचे आवाहन

divyanirdhar

स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना आरक्षण कसं मिळालं? …वाचा

divyanirdhar

गोसेखुर्दचे `बॅक वॉटर’ शेतशिवारात; उभी पिके आली पाण्याखाली, शेतकऱ्यांची उडाली झोप

divyanirdhar

राज्य शासनामुळेच ओबीसी आरक्षण धोक्यात ः अॅड. प्रकाश टेकाडे

divyanirdhar

ग्रामसेवकांच्या प्रवासभत्त्यात वाढ कमी असल्याची खंत

divyanirdhar

आत्तापर्यंत माझा संयम पाहिला, पण…रायगडावरून संभाजीराजे कडाडले 

divyanirdhar