Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्या

डॉ.आंबेडकर बँकेच्या निवडणुकीत समता पॅनल विजयी

नागपूर : उपराजधानीतील अग्रगण्य असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची निवडणूक 12 मार्च 2023 रोजी पार पडली. व निकाल 13मार्च ला लागला. या निवडणुकीत प्राचार्य जानराव गजभिये, प्रा. गुलाबराव वानकर प्रणित समता पॅनलच्या 19 उमेदवारांनी बाजी मारत विजय संपादन केला.
विजयी उमेदवारांमध्ये प्राचार्य जानराव गजभिये, प्रा.गुलाबराव वानकर, अरविंद गजभिये, अशोक कोल्हटकर, अनिल नगरारे , मुरलीधर मेश्राम, धीरेंद्र चहांदे, जयंत जांभुळकर, संदेश कोटांगळे, अशोक गेडाम, गुलाबराव भोयर, धीरज भंडारे, विलास गजभिये,विलास गावंडे, संगीता पाटणकर, चेतना कुंभारे, नागेश बुरबुरे, दशरथ जाधव, विजय भोयर आदींचा समावेश आहे. समता पॅनलच्या विरोधात निवडणूक रिंगणात सहकार पॅनल उभे होते. मात्र त्यांचे केवळ मिलिंद गाणार आणि राहुल मुन हे दोघेच निवडून येऊ शकले. प्राचार्य जानराव गजभिये व प्रा.गुलाबराव वानकर यांच्या कुशल नेतृत्वातील समता पॅनलच्या 21 उमेदवारांपैकी 19 जणांनी विजयी घोडदौड कायम ठेवत डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बँकेचे सुमारे 11215 सभासद असून, त्यांनी भरघोस मतांनी समता पॅनलच्या हाती सत्ता सोपवली आहे.निकाल लागताच समता पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांनी पवित्र दीक्षाभूमीवर जाऊन भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र आदरांजली अर्पण केली.

संपूर्ण सभासदांचे विशेष आभार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाची सन 2023 ते 2028 या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत समता पॅनेलवर सभासदांनी ठेवलेला विश्वास पाहता आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत, असे म्हणत अरविंद जानराव गजभिये यांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट

तथागत गौतम बुद्धांचे जगाला मार्गदर्शक ठरणारे तत्वज्ञान : केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी

divyanirdhar

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

divyanirdhar

डॉक्टर म्हणतात, रुग्णालयातील संपले औषध, आणा बाहेरून

divyanirdhar

पहिल्या फळीतील ४३ टक्केच कर्मचाऱ्यांना लशीची दुसरी मात्रा

divyanirdhar

राज्य लेखा परीक्षकांची नागपुरात कार्यशाळा; राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

divyanirdhar

केवळ 18 टक्के वाटप; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून 80 टक्के वाटप

divyanirdhar