Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीय

लसीकरणावर केंद्र शासनाने दीर्घ धोरण जाहीर करावे; माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुबोध मोहिते यांची मागणी

दिव्य निर्धार प्रतिनिधी

नागपूर ः कोरोनाचा दीर्घकाळ प्रभाव जनमानसावर राहणार आहे. देशात लसीकरणही सुरू आहे. मात्र, लसीकरणाच्या मात्रांची मुदत सहा महिन्यांची आहे. त्यामुळे देशातील १३६ कोटी जनतेच्या आरोग्‍याचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र शासनाने लसीकरणासंदर्भात धोरण जाहीर करावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुबोध मोहिते यांनी केली आहे.

देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०७ लाख ०९ हजार ५५७ इतकी झाली आहे, तर २ कोटी ९८ लाख ४३ हजार ८२५ कोटी रुग्णांनी आतापर्यंत विषाणूवर मात केली आहे. भारतात अजूनही सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून जास्त आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ४ लाख ४ हजार २११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २ कोटी ९८ लाख ४३ हजार ८२५ कोटी रुग्णांनी आतापर्यंत विषाणूवर मात केली आहे. भारताची लोकसंख्या १३६ कोटी आहे. आतापर्यंत देशात ३६ कोटी ८९ लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. तर १०० कोटी जनतेला अद्यापही पहिलाही डोज मिळाला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने लोकांच्या आरोग्यासंदर्भात काय धोरण आहे हे जाहीर करावे. लसीकरणानंतर दिलेल्या मात्रांचा प्रभाव सहा महिन्यापर्यंत राहत असल्याची सांगण्यात येते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी केंद्र सरकारला १३६ कोटी लोकांच्या लसीकरणाचे नियोजन करावे लागणार आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाला लकवा मारल्याचे दिसून येते. त्यामुळे देशातील जनतेचे १०० टक्के लसीकरण केव्हा होईल, हा गंभीर प्रश्न आहे. केंद्र शासनाने देशपातळीवर लसीकरण धोरण जाहीर करावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुबोध मोहिते यांनी केली आहे.

पहिल्या मात्रेनंतर १३६ कोटी पुढे काय?

केंद्र सरकारने १३६ कोटींच्या जनतेच्या आरोग्याच्या नियोजनाचा विचार करावा. पहिल्या डोज घेतल्यानंतर त्याला पुढच्या सहा महिन्यात डोज घ्यावा लागणार आहे. मात्र केद्र सरकारकडे याचे नियोजन दिसत नाही. १३६ कोटी लोकांचे लसीकरण केव्हा होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्याचे नियोजन करावे, असे सुबोध मोहिते म्हणाले.

संबंधित पोस्ट

कोरोना रुग्णाचा उपचार मोफत करा : डी.डी. सोनटक्के

divyanirdhar

रामटेकच्या विकासासाठी किशोर गजभियेंना मतदान करा; प्रचार सभेत नेत्यांनी केले आवाहन

divyanirdhar

कॉंग्रेसचे दरवाढीविरोधात गोधनी येथे आंदोलन ; केंद्र सरकारचा केला निषेध

divyanirdhar

1600 कोटी खर्च येणार, 10 एकरात सेंटर; पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

divyanirdhar

शेतकऱ्यांच्या मुलांना द्या नोकरी; प्रकाश टेकाडे यांचे गडकरींना साकडे

divyanirdhar

बहुजन मुक्ती आंदोलन संघटनेचे धरणे आंदोलन

divyanirdhar