दिव्य निर्धार प्रतिनिधी
नागपूर ः नागपूर जिल्हा कॉंगेसच्या वतीने महागाईविरोधात आंदोलन करण्यात येत असून केंद्र सरकारविरोधात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल घरडे यांनी केले आहे.
जिल्हा पदाधिकारी, समन्वयक, तालुका अध्यक्ष यांना त्यांनी आवाहन केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे व नागपूर जिल्हा (ग्रा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्रजी मुळक यांनी आंदोलनासंदर्भात निर्देश दिले आहेत. महागाई, गॅस ,पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. याकरिता महाराष्ट्रात 17 जुलै 2021 पर्यंत विविध आंदोलने आयोजित केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 11 जुलै रोजी ”स्वाक्षरी अभियाना” चा कार्यक्रम आपल्या विभागाच्या वतीने आयोजित केला आहे. स्वाक्षरी नमुन्यामध्ये प्रत्येक पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरणाऱ्या महिला-पुरुषासहित सर्वसामान्य कार्यकर्त्यांच देखील स्वाक्षरी अभियानात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन अनुसूचित जाती विभाग नागपूर जिल्हा (ग्रा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल घरडे यांनी केले आहे.