Divya Nirdhar
Breaking News
राजकीय

सुबोध मोहिते : राजकारणातील दुर्लक्षित हिरा

राजकीय प्रतिनिधी/दिव्य निर्धार

नागपूर: गेल्या दोन दशकातील विदर्भातील राजकारणात स्वतःला अलिप्त ठेवत, नेहमी धडपडीचे राजकारण करणारा नेता म्हणजे सुबोध मोहिते. त्यांनी अत्यंत कमी वयात बरेच काही मिळाले आणि कमी वेळेत त्यांचे राजकारणातून बरेच काही गेले. मात्र हा माणूस डगमगला नाही. कमी वयात राजकारणात येऊन अनेक प्रस्थापित नेत्यांना भुरळ घालणारा हा नेता एकेकाळी अनेकांना हवाहवासा वाटत होता. मात्र, नव्याने राजकारणात पायघट्ट रोवणाऱ्यांच्या मागे प्रस्थापित धुऊन मागे लागतात. तेच मोहिते यांच्या बाबतीत झाले. विदर्भातीलच नव्हे तर दिल्लीच्या राजकारणामध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केले.  दिल्लीच्या नेत्यांना त्यांचे अप्रूप वाटत होते. शिवसेनेमध्ये असताना त्यांनी युवा कार्यकर्ते जोडले.. युवकांचा आयकॉन म्हणून त्यांना डोक्यावर घेतल्या गेले. कधीही त्याचा बाऊ केला नाही. तर राजकारणात धक्का बसल्यावर धीर सोडला नाही. चार पक्ष फिरल्यानंतरही त्याला संधी मिळाली नाही किंवा संधी मिळू दिली नाही. निराश झाले नाही. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहिते यांना हेरले. विदर्भातील राजकीय नेत्यांची पोकळी भरून काढण्याची संधी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुबोध मोहिते यांच्या निमित्ताने सोडली नाही. एकमेकांना गरज असताना अचूक वेळी सुबोध मोहितो यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. हा प्रवेश त्यांच्या राजकीय करिअरला कलाटणी देणारे असेल यात शंका नाही.

खर तर राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. सुबोध मोहितेंच्या राजकीय प्रवासातून ते अधिक स्पष्ट व्हावे. मोहिते हे मुळात सिव्हिल इंजिनिअर. ‘म्हाडा’मध्ये नोकरीला होते. युतीच्या पहिल्या सरकारमध्ये महादेवराव शिवणकर हे मंत्री झाले आणि मोहिते त्यांचे स्वीय सहायक. तेथे त्यांचा राजकारणाशी पहिला संबंध आला. आपण राजकारण सहज करू शकतो, असे त्यांना वाटल्याने शिवसेनेत प्रवेश केला. नियोजन, मांडणी, व्यक्तिमत्त्व, भाषणाची कला यामुळे शिवसेनेत त्यांचा आलेख वाढत गेला. १९९९मध्ये रामटेक लोकसभेची निवडणूक लढविली. बनवारीलाल पुरोहित यांना पराभूत केले. या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचा हातभार होता. राष्ट्रवादीच्या पांडुरंग हजारेंनी दीड लाखांचे मतविभाजन केले आणि मोहिते बारा हजारांनी विजयी झाले. शिवसेनेतील मुंबईकर नेत्यांना त्यांनी भुरळ पाडली. ते केंद्रीय मंत्री झाले. अवजड उद्योग मंत्रालय मिळाले. सेनेने विदर्भाला पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद दिले. मोहितेंना पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुखही केले. तोवर हे पद फक्त मुंबईकरांना मिळायचे. मोहिते यांनी २००४च्या निवडणुकीत श्रीकांत जिचकारांचा पराभव केला. पुढे या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे पुनर्सीमांकन झाले. मतदारसंघ आरक्षित झाला आणि मोहितेंची अस्वस्थता वाढली. नागपूर लोकसभा मतदारसंघ भाजपकडून सेनेकडे यावा त्यांनी यासाठी प्रयत्न करून पाहिले. दरम्यान, नारायण राणेंनी शिवसेना सोडली. मोहितेही खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये गेले. पोटनिवडणूक लागली. काँग्रेसमधील काही नेत्यांना हा नवा नेता नको होता. शिवसेनेला मोहितेंचा पराभव हवा होता. शिवसैनिक प्रकाश जाधव यांनी मोहितेंना पराभूत केले. त्यांनी विधानसभा लढविली. पराभव झाला. राजकीय अस्तित्वासाठीच्या धडपडीतील सातत्य कायम राखले. त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली, मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे हेलिकॉप्टर आकाशात फिरवत ठेवले. वेळेत मुंबईत पोचूच दिले नाही. ही संधी हुकली. काँग्रेसवरून मन उठल्यावर ते मेटेंच्या ‘शिवसंग्राम’मध्ये गेले. तेथून राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेले. आता राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांचे भविष्य उज्‍वल आहे यात शंका नाही..

संबंधित पोस्ट

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत; समर्थकांमध्ये जल्लोष

divyanirdhar

सरकार बाराबलुतेदारांना उपाशी मारणार काय?, डी.डी. सोनटक्के यांचा सरकारला सवाल

divyanirdhar

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला हिंगणघाटमध्ये विविध कार्यक्रम, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचा पुढाकार

divyanirdhar

कामठीच्या विकासासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना विजयी करा, भाजपचे चंद्रशेखर राऊत यांचे आवाहन

divyanirdhar

जिल्हा परिषदेत भाजपचा स्वबळाचा नारा; १६ जागा जिंकण्याचा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांचा दावा

divyanirdhar

बार्टी ः जातीचे नव्हे विकासाचे करा राजकारण

divyanirdhar