Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमुंबईराजकीयविदर्भ

राजकारणासोबतच प्रबोधनाची समाजाला गरज; अखिल तिरळे कुणबी समाज पदाधिकाऱ्यांचा चर्चासत्रात सूर

दिव्य निर्धार ः प्रतिनिधी
नागपूर ः गेल्या अनेक वर्षांपासून कुणबी समाज राजकारणात असला तरी त्याची राजकीय प्रगती वगळता इतर क्षेत्रातील प्रगती फारशी नाही. त्यामुळे समाजाला राजकारणासोबतच आता समाज प्रबोधनाची गरज मोठ्या प्रमाणात आहे, असा सूर ‘सकाळ’च्या समाजमन कार्यक्रमात अखिल कुणबी समाजच्या पदाधिकाऱ्यांनी काढला. यावेळी शेती, शिक्षण यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

तिरळे कुणबी समाज विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो राजकारणातही सक्रिय आहे. समाजाचे अनेक नेते राजकारणात मोठ्या पदावर गेले. मात्र, समाजाचा उपयोग फक्त आणि फक्त मतपेटीसाठी केला, असा आरोप समाजाकडून होत आहे. अखिल तिरळे कुणबी समाज संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकला. श्री. चव्हाण म्हणाले की तिरळे कुणबी समाज संस्थेची नोंदणी फार जुनी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातही संघटना करण्यात आली आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर१९५० मध्ये त्यांची रीतसर नोंदणी झाली. तेव्हापासून ही संस्था कार्यरत आहे. आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे. शैक्षणिक, कौटुंबिक मेळावे घेण्यात आले. समाजातील गरजू व्यक्तींना कोणतीही गाजावाजा न करता मदतही करण्यात आली. त्यामुळे समाजात संस्थेचा नावलौकिक आहे.
रवींद्र चव्हाण म्हणाले की समाजातील अनेक व्यक्ती राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, त्या व्यक्तींचा समाजाला फारसा लाभ झाला नाही. त्यांनी संस्था आणि इतर साम्राज्य उभे केले. यातून त्यांचा विकास झाला. समाजाचा झाला नाही. समाजाचे अनेक प्रश्न आजही जैसे थे आहेत. समाजातील शिक्षणाचे प्रमाण फार कमी आहे. उच्च शिक्षणामध्ये अत्यल्प नोंद घेता येईल, एवढीच संख्या आहे. कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. आज शेतीची अवस्था आपण बघत आहोत. यातून समाजाची आर्थिक अवनती झाली. कोणत्याही सरकारमध्ये समाजाचे नेते असले तरी शेतीच्या अवस्थेबद्दल कोणीही बोलायला तयार नाहीत. सिंचन, शिक्षण आणि शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा समाजाकडे अभाव आहे. त्यामुळे समाजाची प्रगती मंद गतीने होत आहे.
अखिल तिरळे कुणबी समाजाचे अध्यक्ष सुनील राऊत म्हणाले की शेतीचा विकास झाल्याशिवाय समाजाच्या विकासाची संकल्पना करता येत नाही. गेल्या काही वर्षांत शेतीची जी दुरवस्था झाली. त्यामुळे शेतात १० मजूर ठेवणारा कुणबी शेतकरी आता दुसऱ्याच्या शेतावर काम करण्यासाठी जात आहे. समाजामध्ये प्रबोधन न झाल्यामुळेच असे झाले आहे. यावेळी दिलीप रिनके, अरुण चव्हाण, सुरेंद्र दंडवते, संजय अडासे सुनीता दत्ता राऊत, अश्विनी जयेश तलवारे यांनीही समाजाच्या विविध समस्या आणि पैलूवर प्रकाश टाकला. यावेळी ओबीसी आरक्षण, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह हे मुद्दे मांडण्यात आले.

चांगला समाज घडविण्याचा मानस
राज्यात वेगवेगळ्या समाजाच्या अनेक संस्था आहेत. त्यांची अधिकृत नोंदणीही झाली आहे. त्याला ४० ते ५० वर्षे उलटले आहेत. अशा संस्थांना सरकारने कोणताही मदत केली नाही. सरकारने समाजासाठी लढणाऱ्या संस्थांना समाज भवनासाठी जागा किंवा इतर सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. पण असे झाले नाही. आमची संस्था गेल्या अनेक वर्षांपासून समाजासाठी कार्यरत आहे. येणाऱ्या काळाचे चांगले नियोजन केले असून चांगला समाज घडविण्याचा मानस आहे. यासाठी प्रबोधन करणे सुरू आहे.
– रवींद्र चव्हाण,उपाध्यक्ष, अखिल तिरळे कुणबी समाज

संबंधित पोस्ट

राजोला जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या विजयासाठी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची एकजूट

divyanirdhar

मनपाच्या लाचखोर लिपिकाला अटक; १० हजारांची मागितली लाच

divyanirdhar

नागपूरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा हुकुमशाह…विरोधकांचा आरोप

divyanirdhar

शिक्षण सभापतीने घेतल्या अधिकच्या सायकली, जि.प.अध्यक्षही गोत्यात

divyanirdhar

भाजप केला आरोग्य सेवक, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

divyanirdhar

आश्चर्य आहे ना! …. त्या आठ गावांनी कोरोनाला टांगले वेशीवर

divyanirdhar