जातीयवादी कॉंग्रेस, भाजपसाठी आंबेडकरी जनता अद्यापही अपृश्यच
दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूरः रामटेक लोकसभा मतदारसंघात साडेसहा लाख बौद्धांची मते आहेत. प्रत्येक वेळी कॉंग्रेस आणि भाजप जातीवादी पक्ष बौद्धांनी नाकारतात. तर कॉंग्रेस पक्ष फक्त उमेदवारी देऊन त्यांच्या नेते घरात झोपा काढतात आणि बौद्ध उमेदवार निवडून येत नाही, अशा फुशारक्या मारतात. त्यांच्यासाठी आंबेडकरी जनता अद्यापही अपृश्यच असून साडेसहा बौद्धांचे नेतृत्व करणाऱ्या उच्चशिक्षित किशोर गजभिये यांना निवडून देण्याचे आवाहन समाजाने केले आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडून अंतिम टप्यात येत आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये कृपाल तुमाने खासदार होते. मात्र, त्यांनी मतदारसंघाचा तर सोडाच त्या अनुसूचित जाती मतदारसंघात निवडून आले त्या समाजाचेही प्रश्न सोडविले नाही. एकही प्रश्न संसदेन न मांडणारा हा रामटेक मतदारसंघातील पहिला खासदार असावा. फक्त आरक्षण आहे म्हणून बौद्ध विरोधात वातावरणात निवडून येणाऱ्या या खासदारांना समाजाचे काही देणे-घेणे नाही. गेल्या दहा वर्षांत अनुसूचित जातीवरील अन्यायावर एकही शब्द बोलले नाही. दुसरीकडे कॉग्रेससुद्धा भाजप- शिवसेनेच्या पावलावर पावले ठेऊन बौद्ध विरोधी भूमिका घेत आहेत. गेल्या वेळेस पाऊणे पाच लाख मतदान घेणाऱ्या किशोर गजभिये यांना फक्त बौद्ध उमेदवार निवडून येत नाही म्हणून माजी आमदार सुनील केदार आणि उमरेडचे माजी आमदार राजेंद्र मुळक यांनी बौद्ध विरोधी भूमिका घेतली आहे. उमरेड विधानसभा क्षेत्रात कॉग्रेसचा कोणताही उमेदवार सहज निवडून येण्याची ताकद असताना बौद्ध उमेदवार निवडणुकीत उभा राहील तर राजेंद्र मुळक नेहमी विरोधी भूमिका घेत भाजप उमेदवाला मतदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सांगतात. आणि आपल्या उमेदवाराला पाडण्याचे काम करतो. त्यामुळे दोन्ही विधानसभा निवडणुकीत बौद्ध उमेदवार मेश्राम निवडून हरले. याला राजेंद्र मुळक जबाबदार आहे. त्यांच्याविरोधात समाजात प्रचंड रोष आहे. आमदार राजू पारवे यांना कॉग्रेसमध्ये आणून तिकिट दिली आणि निवडूनही आणले. मात्र भाजप विचारधारेचे असलेले पारवे पुन्हा भाजपच्या मदतीने शिवसेनेत जाऊन कॉग्रेसला ठेंगा दाखविला. नेहमी बौद्ध विरोधी भूमिका घेणारे राजेंद्र मुळक यांनी किशोर गजभिये यांचा लोकसभेसाठी विरोधा करून पुन्हा बौद्ध विरोधी असल्याचे दाखवून दिले. किशोर गजभिये हे दुसऱ्या क्रमाकांचे आणि अत्यंत कमी मताने त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यांना पुन्हा संधी देणे अपेक्षित होते. मात्र, सुनील केदार आणि राजेंद्र मुळक यांनी बौद्ध विरोधी भूमिका घेतली. बौद्ध समाजाचा उमेदवार निवडूनच येत नाही, असे सांगून बौद्धांना राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
कॉग्रेस, भाजप एकाच माळेचे मणी
कॉग्रेस आणि भाजप एका माळेचे मणी आहे. बौद्धांचे राजकीय अस्तित्व संपविणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम भाजपचे अरविंद गजभिये यांना संधी असताना तिकीट नाकारले आणि राजू पारवे यांना शिवसेनेत पाठवून तिकिट दिली. मात्र अरविंद गजभिये बौद्ध असल्यामुळे त्यांना फक्त संघटन बांधणीसाठी उपयोग केला. तर कॉग्रेसनेही किशोर गजभिये यांना फक्त बौद्ध असल्याच्या कारणावरून तिकिट नाकारली. त्यामुळे बौद्धांना या दोन्ही पक्षांना मतदान न करता किशोर गजभिये यांना मतदान करून आपली ताकद दाखवून द्यावी.