दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर ः लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये रामटेक लोकसभाच नव्हे तर राज्यातील बौद्धांच्या राजकीय नेतृत्त्वांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येते. निवडणुकीत बौद्ध उमेदवार चालत नाही म्हणून कॉग्रेसचे सुनील केदार आणि राजेंद्र मुळक यांना बर्वेची काळजी वाटते. तर भाजप आणि शिवसेनेला पारवेंची काळजी आहे. मग साडेसहा लाख बौद्ध मतदार असलेल्या मतदारांचे काळजी कोणाला?, असा सवाल विचारण्यात येत आहे. कॉग्रेस आणि भाजप-शिवसेना एकाच माळेचे मणी असून त्यांनी बौद्धांचे राजकारण संपविण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे साडेसहा बौद्धांनी त्यांना धडा शिकविणे आवश्यक आहे. याकरिता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किशोर गजभिये यांनाच मतदान केले पाहिजे, असा सूर बौद्ध समाजातून उमटत आहे.
राज्यातील निवडणुकामध्ये जातीयवाद टोकाला गेला असून आंबेडकरी बौद्ध नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय अजेंडा झाला आहे. यातून राज्यात अनुसूचित जातीमध्ये ६० टक्के बौद्ध मतदार असलेल्या बौद्धांच्या नेतृत्वाकडे कॉग्रेस आणि शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि सर्वच पक्ष दुर्लक्ष करीत आहेत. किंबहुना त्यांना संपविण्याचा घाट त्यांनी गळी उतरविला आहे. राज्यातील राजकारणात सध्या ‘संविधान बचाव आणि मोदी हटाव नारा’ सुरू आहे. हा नारा बौद्ध समाजात फिरवून कॉग्रेस मतदान मागत आहे. मात्र, उमेदवारी देताना भाजपपेक्षाही बौद्धविरोधी टोकाची भूमिका घेताना दिसून येत आहे. आतापर्यंत कॉग्रेस नेत्यांना राज्यातील नेतृत्व संपविले. त्यांच्या गटागटांना राजाश्रय देऊन समाजात दुफळी निर्माण करून स्वतःची व्होट बॅंक तयार करण्याचा प्रयत्न केला. भाजपचा वैचारिक विरोध असल्याने कॉंग्रेसला रिपब्लिकन नेत्यांना सहकार्य केले. ऐवढच नव्हे तर त्यांचे उमेदवार निवडून दिले. त्या बदल्यात कॉग्रेसने एक बौद्ध उमेदवार दिला. मात्र, तो निवडून येऊ नये, याची नेहमी काळजी नेहमी घेतली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात बौद्धांची मते साडेसहा लाखांवर आहे. त्यामुळे बौद्ध उमेदवार स्वतःच्या बलबुत्यावर निवडून येऊ शकतो. मात्र, समाजाला कॉग्रेसने दावणीला बांधले. नेत्यांनी आमिष दाखवून त्यांना खुजे केले. नेतेही आमदार की खासदारी मिळेल म्हणून कॉग्रेससोबत गेली. मात्र, कॉग्रेस ही बौद्ध विरोधी असल्याचे आतापर्यंतच्या निवडणुकांवरून दिसून येते आहे. रामटेक मतदारसंघात गेल्या वेळेस किशोर गजभिये यांना पाऊणे पाच लाख मते मिळाली होती. त्यावेळेस ते नवखे असल्याने त्यांना कॉग्रेसच्या एकाही नेत्यांनी सहकार्य केले नाही. उलट शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांना आतून सहकार्य केले. यामुळे किशोर गजभिये यांचा पराभव झाला. माजी आमदार सुनील केदार आणि राजेंद्र मुळक सध्या बर्वे निवडून यावा, याकरिता जिवाचा आटापिटा करीत आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत राजेंद्र मुळक यांनी उमरेड विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना आणि भाजपला मतदान होईल, अशीच भूमिका घेतली. त्यामुळे उमेरड मतदारसंघात कृपाल तुमाणे यांना भरीव मतदान मिळाले. तर इतर मतदारसंघातही कॉग्रेस नेत्यांनी किशोर गजभिये यांच्याविरोधात भूमिका घेतली. प्रचाराला सहकार्य न करता फक्त त्यांच्याकडून पैसा घेऊन बिळात लपून बसले. त्यामुळेच किशोर गजभिये यांचा पराभव झाला. याला जबाबदार कॉंग्रेस नेते होते. आताही किशोर गजभिये हे निवडून येण्याच्या स्थिती असताना त्यांना उमेदवारी दिली नाही. कारण काय तर बौद्ध उमेदवार निवडून येत नाही. ही भूमिका कॉग्रेस नेत्यांची राहिली तर त्यांना बौद्धांची मते कशी चालतात, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला हवा. पण बौद्ध विरोधी भूमिका कायमची डोक्यात गेल्याने त्यांना विचार करण्यास वेळ मिळणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत बौद्धांनी स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी किशोर गजभिये यांना मतदान करणे आवश्यक आहे.
कॉग्रेसमध्ये बौद्धांचा टोकाचा द्वेष
उमरेड मतदारसंघात कॉग्रेस उमेदवार पडण्याची स्थिती नसतानाही दोनदा बौद्ध उमेदवार दिला म्हणून त्यांना निवडणुकीत पाडण्यात आले. याला घरचा भेदी राजेंद्र मुळक जबाबदार आहे, सर्वांना माहिती आहे. बौद्धांविरोधात टोकाची भूमिका घेणारे हे नेते आहेत. त्यांना फक्त बौद्धांची मते चालतात. साधे जिल्हा परिषद सदस्यांसाठी उमेदवारी देताना त्यांना बौद्ध उमेदवार चालत नाही. स्वतंत्र विचारांचा बौद्ध उमेदवारांची त्यांना चिड आहे. आजही कॉग्रेस नेते राजकीय अपृश्यता पाळत असल्याचे दिसून येते. उमरेड मतदारसंघात कॉग्रेस नेत्यांनी बौद्ध नेत्यांची गळचेपी करून त्यांनी राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक नेत्यांना संघटनेतही पदे दिली जात नाही. ‘जात’ पाहून पदे देण्याचा प्रकार कॉग्रेसने रुजविण्याचे दिसून येते.त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव असताना ते बौद्ध जिल्हा परिषद सदस्यांना देण्यात आले नाही, कारण काय तर बौद्ध नेतृत्व मोठे झाले तर आपल्या डोक्यावर बसेल ही भीती आजही कॉग्रेस नेत्यांना आहे. त्यातून बौद्धांची टोकाची विरोध करण्यात येत आहे.
कॉग्रेसमधून पारवे पळाले, आता बर्वे आणले!
उमरेड मतदारसंघात बौद्ध निवडून येत नाही म्हणून राजेंद्र मुळक यांनी राजू पारवेला तिकीट दिली. रात्रंदिवस एकत्र करून त्यांना निवडून आणले. पण शेवटी राजेंद्र मुळक यांना तोंडघशी पाडत शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली. ते राजेंद्र मुळक हे राजू पारवे यांच्याविरोधात आगपाखड करीत आहेत. उमरेड मतदारसंघात बौद्ध उमेदवार निवडून आणला असता तो शेवटपर्यंत कॉग्रेससोबत प्रमाणिक राहिला असता. पण राजेंद्र मुळक यांना प्रामाणिक बौद्ध उमेदवार चालत नाही. त्यांना कॉग्रेसचे जहाज बुडवायची सवय झाल्याने ते आयात करून उमेदवार आणतात. तोच प्रकार आता लोकसभा निवडणुकीत कॉग्रेस नेत्यांनी केला आहे. रश्मी बर्वे यांची उमेदवारी अर्ज बाद होणार हे माहीत असतानाही ही त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पतीला एबी फॉर्म दिला. शामकुमार बर्वे यांना राजकारणाचा ‘ढ’ माहीत नसताना त्यांना उमेदवारी दिली, ती फक्त बौद्ध विरोधी भूमिकेतून दिली. त्यामुळे कॉग्रेसला प्रमाणिक बौद्ध नेत्यांची गरज नाही. आता बौद्ध मतदारांना कॉग्रेसची गरज नाही हे दाखवून देणे आवश्यक आहे. त्यामुळे किशोर गजभिये यांना निवडून देणे आवश्यक आहे.