Divya Nirdhar
Breaking News
नागपूरमहाराष्ट्रविदर्भ

प्रत्येकाने बुद्धाच्या तत्त्वज्ञाने पालन करणे आवश्यक : महाराष्ट्र विद्रोही चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव

नागपूरः माणसामाणसांतील जातीयता, भेदभाव, अंधश्रद्धा दूर करावयाची असेल तर प्रत्येकाने बुद्धाच्या तत्त्वज्ञाने पालन करणे आवश्यक आहे. यातून मानवाचे कल्याण आहे, असे मत महाराष्ट्र विद्रोही चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव यांनी व्यक्त केले. नागपूर येथील बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने राष्ट्रीय बुद्ध जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हे बोलत होते. ऑनलाइन पार पडलेल्या महोत्सवामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान,अंदनाम निकोबार यासह अनेक राज्यातील विचारवंत सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन चाहांदे होते. धनाजी गुरव म्हणाले की, जो उपदेश बुद्धाने आपल्याला केला तो आपल्या जीवन जगण्याचा भाग झाला तरच बुद्ध धम्माची गोड फळे आपणास सर्व क्षेत्रात चाखायला मिळतील. जातीयता, धर्मांधता, गरिबी,अंधश्रद्धा, द्वेष, अत्याचार, विषमता सध्या जगभर उच्छाद मांडत आहे. त्यावर बुद्ध हेच उत्तर आहे. तर अध्यक्षीय भाषण बबन चाहांदे म्हणाले की, बौद्ध पुरातत्त्व वारसा भारत, पाकिस्तान,अफगाणिस्तान या पूर्वीच्या जम्बूद्वीपमध्ये दररोज मिळतो आहे. त्याचे जतन करून पालीचे लोक भाषेत बुद्ध उपदेशाचा अनुवाद केला पाहिजे. लेह लडाखचे फुनसुक लडाखी यांनी बुद्ध हा चर्चेचा विषय नसून अनुसरण्याचा मार्ग असल्याचे सांगितले. तर तामिळनाडूचे अमारेसान म्हणाले की,आपली सर्वांप्रति मैत्री असली पाहिजे तेव्हा वैर नष्ट होईल आणि धम्म प्रसार होईल. कर्नाटक येथील तिबेटीयन ताशा डोलमा,अंदमान निकोबारचे विराबाबू,आंध्र प्रदेशचे डॉ.दोराबाबू यांची विचार व्यक्त केले. राजस्थानचे टीकमचंद लोहिया यांनी बुद्ध धम्म राज्य निर्मितीसाठी १० हजार चौ. फु. जमीन बुद्ध विहार बांधण्यासाठी दान करीत असल्याचे जाहीर केले. डॉ.पुष्पाताई थोरात यांचेही भाषण झाले. समितीचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती यांनी प्रास्ताविक केले. प्रा.उमेश पठारे यांनी संचालन केले. हर्षवर्धन पठारे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. तेलंगणाचे राजेंद्र प्रसाद नरहरी यांनी आभार मानले.

संबंधित पोस्ट

पैशाचा पडला पाऊस, हुबेहुब छापल्या शंभरच्या नोटा..

divyanirdhar

तृणमूलच्या गुंडगिरीविरुद्ध लढा देण्याचा निर्धार, नोकरीवरून काढून टाकलेल्यांना अर्थसाह्य

divyanirdhar

तो आपला घात करेल’…पाच जणांची हत्या करून केली आत्महत्या

divyanirdhar

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी कास्ट्राईबने उचलला विडा

divyanirdhar

तथागत गौतम बुद्धांचे जगाला मार्गदर्शक ठरणारे तत्वज्ञान : केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी

divyanirdhar

नागपूर मनपाचा खड्ड्यांवर कोट्यवधींचा खर्च,कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे नियोजन

divyanirdhar