उल्हास मेश्राम : दिव्य निर्धार प्रतिनिधी
साळवा/प्रतिनिधीः आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विशरच्या साह्याने विझविण्यासाठीची तातडीची व्यवस्था असते. मात्र हे यंत्र चालविण्याची माहिती असणे अपेक्षित आहे. या हेतूने महाविद्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांना व विध्याथाना राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातुन प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनीही फायर एक्स्टिंग्विशर हाताळले.
श्री लेमदेव पाटील महाविद्यालयात फायर एक्स्टिंग्विशर बसविण्यात आले आहे. आग लागल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून फायर एक्स्टिंग्विशर यंत्रणा महत्त्वाची ठरते. अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही यंत्रणा महत्त्वाची ठरते. त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित असणे अपेक्षित असल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने महाविद्याल आवारातील कर्मचाऱ्यांसाठी व विध्याथाना आग विझविण्याचे प्रशिक्षण आयेाजित करण्यात आले होते. महाविद्यालय च्य मैदानात येका बाजुला आग लागल्यासारखी परिस्थिती निर्माण करून आपत्ती व्यवस्थापन दलाच्या कर्मचाऱ्यांनी फायर एक्स्टिंग्विशरच्या मदतीने आग तत्काळ विझविण्यात आली. याबाबत कर्मचाऱ्यांना व विध्याथाना मार्गदर्शन करण्यात आले.
अग्नीशमन दल आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनू फायर सर्व्हीसेसचे सोनू मेश्राम यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाची माहिती देण्यात आली. डॉ प्रदीप रंदीवे प्राचार्य, डॉ अविनाश तितरमारे क्रिडा विभाग प्रमुख आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी , डॉ महेश गायधने रासेयो कार्यक्रम अधिकारी, सोबत प्रा. पंकज मेश्राम, डॉ. दीपक तईकर तसेच डॉ. दिलीप गंथाले यांच्याकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.