Divya Nirdhar
Breaking News
railway minister
ठळक बातम्याराष्ट्रीय

रेल्वे कर्मचारी आता करणार रात्री 12 पर्यंत काम

नवी दिल्ली : अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. त्यानुसार रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचारी आता रात्री 12 वाजेपर्यंत काम करताना दिसणार आहेत. मात्र, हा आदेश केवळ मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आ

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करणार आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांची पहिली शिफ्ट ही सकाळी 7 वाजता सुरू होईल. ही शिफ्ट दुपारी 4 वाजता संपेल. तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 12 वाजता संपेल. हा आदेश केवळ एमआर सेलला (मंत्री कार्यालय) लागू राहणार आहे. सर्व रेल्वे कर्मचारी किंवा खासगी रेल्वे कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू नसेल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजीपीआर डीजे नारायण यांनी दिली.

रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित सर्व कार्यालयांना हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्याने दिले आहेत. त्यानुसार केवळ रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांनाच दोन शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे, असं नारायण यांनी सांगितलं. मिशन मोडसाठी रेल्वेसाठी बरंच काही करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. एमआर सेलचा अर्थ मंत्र्याचं कार्यालय. त्यामुळे हा आदेश केवळ या कार्यालयासाठी लागू असेल, असंही ते म्हणाले. भारतीय रेल्वे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोणाचा एक भाग आहे. रेल्वेवर मोदींचा फोकस असून त्यावर त्याबाबतची त्यांची काही स्वप्ने आहेत, ती सत्यात उतरवण्याचा माझा प्रयत्न आहे, असं वैष्णव म्हणाले.

– रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या
– कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील
– सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत पहिली शिफ्ट
-दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत दुसरी शिफ्ट
– रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय

संबंधित पोस्ट

काँग्रेसमध्ये धुसफूस, नवा गडी नवा राज

divyanirdhar

अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेत मुलींची बाजी, 154 पुरस्कारांचे वितरण

divyanirdhar

‘ब्लू टीक’च्या नादात होईल घात; फेसबुक, इन्स्टावर दलाल सक्रिय

divyanirdhar

शेतकरी मिशन ‘सरकार आपल्या दारी’ ; किशोर तिवारी घेणार आढावा

divyanirdhar

नागपूरच्या आरोग्य सेवेत आठपटीने वाढ झाल्याचा पालकमंत्री राऊत यांचा दावा

divyanirdhar

‘अनामित्रा प्रॉपर्टीज’च्या संचालकाकडून मेहता यांना सदनिकेची विक्री

divyanirdhar