Divya Nirdhar
Breaking News
corona
ठळक बातम्यानागपूरविदर्भ

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कोरोना रोखण्यासाठी हे केले उपाय…वाचा

चंद्रपूर : व्याहाड खुर्द येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा आहे. या शाखेत परिसरातील सुमारे 30 गावे समाविष्ट आहेत. सुमारे 14 हजारांवर नागरिकांचे खाते आहेत. या नागरिकांना शाखा व्यवस्थापक, लिपिक असे एकूण सात कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण राज्यात हाहाकार माजविला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरापासून गावखेड्यापर्यंत रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. अशास्थितीतही सर्वसामान्य ग्राहकांना सेवा देण्याचे काम बॅंकांचे कर्मचारी करीत आहेत. थेट जनतेशी संपर्क येत असल्याने अनेक कर्मचारी बाधितही झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून आठवड्यातील दिवसानुसार गावांतील ग्राहकांना सेवा दिली जात आहे. येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने हा उपक्रम सुरू केला आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बॅंकेत खातेदारांची होणारी गर्दी बघता कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत होती. अशात तहसीलदार परिक्षित पाटील यांनी बॅंकांत गर्दी न करता खातेदारांना सेवा द्यावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार येथील शाखा व्यवस्थापक श्री. पंत यांनी गर्दी कमी करण्यासाठी आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. आठवड्यातील दिवस गावांसाठी ठरवून देण्यात आले. यात सोमवार या दिवशी व्याहाड, किसाननगर, हिरापूर, मंगळवारला केरोडा, कोंडेखल, जांब बूज., रुई, बुधवारला मोखाळा, व्याहाड बूज., सामदा, सोनापूर, गुरुवारला थेरगाव, चिचबोडी, निमगाव, शुक्रवारला बेलगाव, चकविरखल, दाबगाव, नवेगाव, राजोली चक या गावांचा समावेश आहे.
संबंधित गावातील खातेदारांना ठरलेल्या दिवशीच बॅंकेची सेवा दिली जात होती. बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर, पेंडाल अशी व्यवस्था करण्यात आली. पेंडालमधील खातेदारांसाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली होती. नाव घेतल्यानंतर संबंधित खातेदाराला सेवा दिली होती. या उपक्रमामुळे गर्दी कमी झाली. त्यामुळे बॅंकेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
लाखाच्या संख्येत नवीन रुग्णांची भर पडत होती. तर, हजाराच्या संख्येने रुग्णांचा दिवसाला मृत्यू होत होता. त्यामुळे राज्य शासनाने प्रतिबंधात्मक म्हणून एप्रिल महिन्यात राज्यात संचारबंदी लागू केली. अत्यावश्येक सेवावगळता सर्व बाजारपेठा, दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. अत्यावश्य्क सेवेत असल्याने बॅंकांचा व्यवहार सुरू आहे. अशात खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांच्या बॅंकेत चकरा वाढल्या होत्या. निवृत्ती वेतनधारक, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग, वयोवृद्ध लाभार्थी यांचे येणे सुरूच होते.

कर्मचाऱ्यांचा बॅंकेतच मुक्काम
बॅंकेतील काही कर्मचारी दुसऱ्या गावाहून ये-जा करीत होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्व भूमीवर ये-जा करण्याने संसर्ग वाढण्याची शक्य ता होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बॅंकेतच राहून खातेदारांना सेवा देण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यांपासून येथील पाच कर्मचारी बॅंकेतच मुक्कामी आहेत.

संबंधित पोस्ट

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर करणार – पंतप्रधान

divyanirdhar

बार्टीमुळे गवसला विकासाचा मार्ग ः महासंचालक धम्मज्योती गजभिये

divyanirdhar

शेतकरी प्रश्नावर कृषी सभापती आमधरे यांनी शरद पवारांकडे का केली विनंती…वाचा

divyanirdhar

डॉ.आंबेडकर बँकेच्या निवडणुकीत समता पॅनल विजयी

divyanirdhar

राजोला जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या विजयासाठी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची एकजूट

divyanirdhar

माजी कृषींमंत्री अनिल बोंडे म्हणाले, कृषी कायदे कधी रद्द होणार नाहीत…

divyanirdhar