Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

खैरे कुणबी समाजातील समस्यांवर सरकारही गप्पच : गुणेश्वर आरीकर यांचा सवाल ः शिक्षणातील मागासलेपणामुळे समाज गंभीर संकटात

दिव्य निर्धारप्रतिनिधी

नागपूर ः प्रत्येक समाजामध्ये साडेबारा जाती आहे. कुणबी समाजातही साडेबारा जाती आहेत. त्यातील खैरी कुणबी हा समाज आहे. फक्त आणि फक्त शेतीवर उपजीविका करणारा समाज आजही शिक्षणापासून दूर आहे. शिक्षणातील मागासलेपणामुळे त्यांच्यावर अवकळा आली आहे. ती दूर करायची असेल तर समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणाचा कास धरावी. तसेच शासन आणि समाजातील इतर जातींनीही त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करावे, असा सूर खैरे कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी काढला. सकाळतर्फे आयोजित समाजमन कार्यक्रमात समाजाच्या विविध समस्या आणि मागण्यांवर त्यांनी भर दिला.

विदर्भात खैरे कुणबी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पूर्व विदर्भात तर गावाचे गाव या समाजाचे आहेत. नागपूर जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या या समाजाची आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात खैरे कुणबी समाज आहे. समाजाच्या समस्याही भरपूर आहेत. खैरे कुणबी समाजाचे विदर्भ अध्यक्ष गुणेश्वर आरीकर यांनी समाजाच्या समस्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, हा समाज ओबीसीमध्ये येतो. त्यांना विविध प्रकारचे आरक्षण असले तरी त्या आरक्षणाचा लाभ या समाजाला मिळाला नाही. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. मात्र, या समाजातील शिक्षणाचे प्रमाण फार अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. शिक्षणाकडे समाजाचे दुर्लक्ष तर आहे शिवाय गेल्या काही वर्षात समाजाची आर्थिक घडी विस्कटली आहे.

गुणेश्वर आरीकर म्हणाले की, खैरी कुणबी समाज हा शेतीवर आपली उपजीविका करतो. गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, नापिकीमुळे शेतातील उत्पादनात मोठी घट झाली. घट झाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नही कमी झाले. शेतीवर खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशा स्थितीत त्यांच्यावर कर्जांचा डोंगर वाढत गेला आहे. कर्ज आणि नापिकीमुळे त्यांच्यासमोर अनेक समस्या आणि अडचणी निर्माण झाल्या असून त्यांच्याकडे यातून सुटका करण्यासाठी इतर कोणतेही मार्ग राहिले नाहीत. गुणेश्वर आरीकर हे खैरे कुणबी बहुउद्देशीय विचार मंचचे अध्यक्ष आहेत. तसेच ते विविध संघटनांसोबत जुळले आहेत.

शेतीपूरक व्यवसायाकरिता सुलभ कर्ज मिळावे

खैरी कुणबी समाज हा शेतीवर विसंबून आहे. शेतीचा अवस्था बिकट आहे. अशाप्रसंगी शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाकरिता शासनाने सुलभरीत्या कर्ज उपलब्ध करून दिल्यास त्यांना मोठा आधार होईल. शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा. समाजातील इतर संघटनांनी खैरे कुणबी समाजातील मुलांकरिता मोफत वसतिगृह सुरू करावे, मुली व महिलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. शहरातील विविध समाज संघटनांनी ग्रामीण भागातील मुली, मुले आणि महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध योजना सुरू कराव्यात.

उच्चपद अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्नगुणेश्वर आरीकर

खैरे कुणबी समाजात उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी असले तरी त्यावर उपाय म्हणून संघटनेच्या वतीने वाचनालय सुरू करण्यात येतील. स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यावर भर देण्यात येईल. यातून उच्चपद अधिकारी निर्माण व्हावे याकरिता प्रयत्न करणार आहे. समाजातील प्रत्येक घटक संघटनेच्या बाजूने ठाम आहे. येणाऱ्या काळात शिक्षणावर भर दिल्याशिवाय प्रगती होणार नाही, असे खैरे कुणबी समाज संघटनेचे विदर्भ अध्यक्ष गुणेश्वर आरीकर यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

…तर राजकीय संन्यास!; ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

divyanirdhar

नागपूरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा हुकुमशाह…विरोधकांचा आरोप

divyanirdhar

हिवाळी अधिवेशनात सावजी हॉटेलची विशेष क्रेझ

divyanirdhar

सहा महिन्यांपासून रेशनच्या धान्यासाठी वणवण…अधिकारी देतात हुलकावणी

divyanirdhar

ओबीसी, मराठा आरक्षणाच्या आग्रहामुळे आमदारांचे निलंबन; भाजप जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्त्वात जिल्हाभर आंदोलन

divyanirdhar

आमदार राजू पारवे यांच्या हस्ते कुही तालुक्यात विविध कामाचे भूमिपूजन

divyanirdhar