



बौद्धांनी सम्यक मार्गाने येऊन आपला लढा उभाराला पाहिजे आणि रिपब्लिकन चळवळ ही सामाजिक आणि राजकीय स्तरावर पोहोचली पाहिजे, यासाठी नियमित लढा देणारे दुर्वास चौधरी सर. यांचा आज, वाढदिवस. नेहमी हसतमुख राहून प्रत्येकांना भावी आयुष्यासाठी प्रोत्साहन देणारे आहे. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक लोक घडले आहेत. अनेकांना त्यांनी आधार दिला आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा विस्तार होत गेला आहे. आज, २२ मे २०२५ त्यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मंगलमय शुभेच्छा.
नागपुरातील धम्मक्रांतीचे संस्थापक दुर्वास सोमाजी चौधरी यांचे बौद्ध आणि आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. अनेक वर्षांपासून ते आंबेडकरी चळवळीत काम करीत असून बाबासाहेबांच्या विचारांवर पादाक्रांत करणारे ते थोर व्यक्तीमत्त्व आहे. समाजातील युवावर्गाने राजकारणात यावे, याकरिता ते प्रयत्नशील आहेत. याकरिता त्यांनी रिपब्लिकन पक्षाला मजबूत करण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. बाबासाहेब गेल्यानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. पहिल्याच निवडणुकीत आठ खासदार आणि एक राज्यसभा सदस्य असे ९ खासदार होण्याचे भाग्य आम्हा रिपब्लिकन जनतेला मिळाले. त्यानंतर रिपब्लिकन पक्षासोबत रिपब्लिकन विचारधारा समाजात रूढ झाली. गेल्या अनेक वर्षांपासून ही विचारधारा समाजातील व तळागाळातील प्रत्येक माणसाच्या रक्तात भिनली. आज या पक्षाचे अनेक शकले झाली असली तरी त्यांची नाळ मात्र, रिपब्लिकन पक्षाच्या मूळ विचारधारेसोबत जुळली आहे. ही विचारधारा अजूनही जिवंत आहे. ती तिला जिवंत ठेवण्याचे काम समाजातील प्रत्येकजण करीत असले तरी त्याचा पिंपळवृक्ष करण्याची जबाबदारी आजही ७५ वर्षानंतरही खांद्यावर घेतलेले दुर्वास चौधरी खऱ्या अर्थाने रिपब्लिकन विचारधारेचे खरे लढवय्या आहेत. समाजाचा राजकीय पक्ष असावा आणि तोही रिपब्लिकन पक्षच असावा, असा ठाम निर्णय घेऊन ते आजही गावागावांत फिरून रिपब्लिकन विचारधारा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आयुष्यमान दुर्वास चौधरी करीत आहेत.
दुर्वास चौधरी सर हे बौद्ध आणि राजकीय क्षेत्रात नवे नाही. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी रिपब्लिकन विचारधारेशी एकनिष्ठ राहून त्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार केला आहे. आज, त्यांचा वाढदिवस. २२ मेला ते ७५ वर्षांचे होतील. याही वर्षी ते बौद्ध विचाधारेला बळकटी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते जिल्हाध्यक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष प्रत्येकाच्या मनात आहे. तो फक्त मतपेटीतून दिसून यावा म्हणून ते प्रयत्न करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. संविधानावरही ते फार जिव्हाळ्याने बोलतात. सध्या संविधान वाचविणे हा एकमेव अजेंडा भारतातील प्रत्येक नागरिकाचा असायला पाहिजे; कारण तुमचे संविधान शाबूत असेल तर तुमचे अधिकार अबाधित राहतील. आणि अधिकार अबाधित असतील तर प्रत्येकाचा विकास होईल, असे त्यांना वाटते. गेल्या अनेक वर्षांपासून देशात असलेली सर्वधर्मसमभावाची संकल्पना मोडीत निघण्याची शक्यता आहे. धर्मनिरपेक्ष देशात आता धर्माच्या नावाने युद्ध होण्याची शक्यता आहे. धर्माच्या नावे दंगली होतील. यात शेकडो निष्पाप नागरिकांची बळी जाईल. त्यांच्यावर बोलणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी भीतीही ते व्यक्त करीत आहेत. याकरिता संविधान वाचविण्यासाठी हे आंदोलन आणि बैठका घेत आहेत. दुर्वास चौधरी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने सावध असणे आवश्यक आहे. संविधान जिवंत असेल तर तुमचे-आमचे अस्तित्व राहील; अन्यथा गुलामगिरीची सुरुवात झाली आहे. फक्त हुकूमशाहीची घोषणा होणे शिल्लक आहे. आपण याकडे दुर्लक्ष केले तर काही दिवसांत ती वेळ आपल्यावर येईल. त्यामुळे संविधानाचे रक्षण होणे आवश्यक आहे. संविधान बचावाच्या घोषणा फक्त भाषणापुरत्या न ठेवता त्या प्रत्यक्षात उतरविण्यात आल्या पाहिजेत. संविधानाप्रति जागृत असलेल्या व्यक्तीने या लढ्यात भाग घेणे आवश्यक आहे. गाव, गल्ली आणि शहरातून देशाच्या कानाकोपऱ्यांतून या लढ्याला सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. संविधान रक्षणासाठी पुन्हा एका धम्मक्रांती गरज आहे. आणि ती धम्मक्रांती प्रत्येकाने स्वतःपासून सुरू करावी, अशी अपेक्षाही दुर्वास चौधरी व्यक्त करतात. दुर्वास चौधरी. नागपुरातीलच नव्हे तर विदर्भातील आंबेडकरी चळवळीतील थोर व्यक्तिमत्त्व. युवा अवस्थेत असताना त्यांनी आंबेडकरी चळवळीला गती देण्याचे काम केले. उच्च शिक्षित असे ते व्यक्तिमत्त्व. अडल्यानडल्यांना मदत करून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका नेहमीच सक्रिय राहील आहे. ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी. दुर्वास सोमाजी चौधरी हे त्यांचे पूर्ण नाव. कावरापेठ येथे त्यांचे आईवडील राहत असते. उमरेड हा परिसर कोळसा खाणींनी व्याप्त असा भाग. आईवडील गरीब असल्याने एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर नेहमीच राहत असते. दोन वेळेचे पोट कसे भरावे या चिंतेचे नेहमी त्रस्त असत. त्यांचे आईवडील शेती करीत असत. सिंचनाची सोय नसल्यामुळे शेती वरथेंबीच होती. त्यांचे वडील सोमाजी चौधरी जिद्दी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले होते. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी जेव्हा १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्यावेळी ते जातीने हजर होते. दुर्वास सोमाजी चौधरी यांचा जन्म २२ मे १९४९ रोजी उमरेड येथे झाला. आंबेडकरी चळवळीचे ते सुजाण विश्लेषक आहेत. बौद्ध आणि आंबेडकरी चळवळीसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. ते ७३ वर्षाचे आहेत. त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजविणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना आंबेडकरी चळवळ उभी केली. गावागावांत जाऊन त्यांनी चळवळीला बळ दिले. जिल्ह्यातील प्रत्येक गावांत त्यांचा चाहता आहे. रोखठोक बोलण्याची त्यांची सवय बघून अनेकजण त्यांच्यापासून हबकून राहतात. सत्याची बाजू घेऊन हे नेहमीच उभे राहतात. बुद्धांचा सत्याचा मार्ग हा उन्नतीचा आहे, त्याला घाबरण्याचे कारण नाही. तात्पुरता त्रास होईल. मात्र, अनेक वर्ष सत्याचा सहवास आपल्याला लाभेल अशी त्यांची साधी विचारसरणी आहे. अडल्यानडल्यांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर राहतात. त्यांच्या मदतीमुळे आज अनेकजण स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. खऱ्या आंबेडकरवादावर त्यांचा विश्वास आहे.राजकारणावर अधिक भर दिला पाहिजे. असे त्यांचे विचार आहे. यातून ते गेल्या पाच वर्षापासून विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत चर्चा करून आंबेडकरी राजकारण कसे पुढे गेले पाहिजे, याचा ते विचार करतात. यातून धम्मक्रांतीची निर्मिती झाली. जाटततरोडी येथील इंदिरानगर परिसरात त्यांनी धम्मक्रांती उभी केली. धम्मक्रांतीतून ते समाजाला धम्माचे आणि राजकारणाचे धडे देत आहेत. रिपब्लिकन पक्षात अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांनी राजकारणाशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे निकोप राजकारण युवक घडविण्याचा त्यांचा मानस आहे. याकरिता पॉलिटिकल्स स्कूलची स्थापना केली. युवकांना राजकारणाचे धडे देण्याचे काम करीत आहेत. आपल्याकडे राजकारण आहे. अभ्यासू लोक आहेत. मात्र, त्यांना आपली कौशल्य दाखविण्यासाठी स्टेज नसल्यामुळे आपला युवक इतर पक्षात जात आहे. त्यांच्यासाठी स्वतःचा पक्ष असणे आवश्यक आहे, अशी त्यांची भूमिका आहे. यातून त्यांनी पॉलिटिकल्स स्कूलची स्थापना केली आहे. या माध्यमातून ते समाजातील प्रत्येक घटकांसोबत चर्चा करून समाजाच्या प्रगतीवर चर्चा करीत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे समाजासाठी मोठे योगदान आहे. समाजातील उणिवा आणि समाजाचे मजबूत विचार यावर त्यांच्यासोबत चर्चा केल्यास आपल्याला समाज घडविण्यासाठी आवश्यक ते मटेरिअल त्यांच्याकडून आपसूकच मिळेल. ते ७५ वर्षांचे झाले असून ते ७६ वर्षांत पदार्पण करीत आहेत. समाजातील थोर व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
–