नागपूर : शेतकरी आर्थिक संकटात असले तरी खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला लागले आहेत. शेतकर्यांतचे वर्षभराचे आर्थिक बजेट याच हंगामावर अवलंबून असते. मे महिन्याच्या कडक उन्हात शेतकर्यांतनी मशागतीची कामे आटोपती घेतली. काही शेतकर्यां चे काम अंतिम टप्प्यात आहे. पीककर्ज मिळालेल्या शेतकर्यां नी बी-बियाणे, खते खरेदीला सुरुवात केली आहे. मृगाच्या पावसाची प्रतीक्षा असून, सरी कोसळताच पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. तर प्रतिबंधित बियाणे खरेदीपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन शेतकरी राजानंद कावळे यांनी केले आहे.
कोरडा व ओला दुष्काळाशी दोन हात करीत असताना कोरोनाच्या काळात शेतकर्यांलच्या आर्थिक अडचणीत आणखी भर पडली आहे. गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामातून शेतकर्यांयच्या पदरात काहीच पडले नाही. ओल्या दुष्काळाने शेतकर्यांषचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतातून माल घरात आला. मात्र, त्यातून लागवड खर्चही निघू शकला नाही. खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्यांलनी रब्बी हंगामात कंबर कसली. त्यातही तोटाच सहन करावा लागला. एक हंगाम साथ देईल, या आशेवर पाणीच फेरले जात आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात आलेली निराशा झटकून शेतकरी नव्या उमेदीने कामाला लागत आहे. जिल्ह्यात नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यात कपाशी, सोयाबीन, तूर या मुख्य पिकाचा समावेश आहे. वर्षभराचे आर्थिक गणित याच हंगामावर अवलंबून असते. त्यामुळे काही झाले तरी आर्थिक तजवीज करून पेरणी करण्याचा प्रयत्न आहे. या हंगामात शेतकर्यां ना पीककर्जाचा मोठा आधार ठरतो. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँक सोडल्यास इतर बँकाकडून पीककर्ज देताना आखडता हात घेतला जातो. हा अनुभव दरवर्षीचा आहे. वेळेवर पेरणी साधावी म्हणून शेतकरी सावकाराकडून पैसे घेऊन गरज भागवत आहेत.
कोरोनानेही घेरले
एक वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गापासून शेतकरी सुटू शकले नाहीत. कित्येकांना बाधा झाल्याने औषधोपचारावर खर्च करावा लागला. त्यातून बरे झालेल्यांचे पाऊल पुन्हा शेतीकडे वळले आहे. पेरणीच्या वेळी पैसा उपलब्ध न झाल्यास खते व बी-बियाण्यांसाठी कुठून तजवीज करावी, ही चिंता शेतकर्यांाना सतावत आहे, असेही शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे म्हणाले.