Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय

अॅड.संतोष लांजेवार यांना बहुमताने विजयी करा; सामान्य जनतेने केले आवाहन

दिव्यनिर्धार वृत्तसेवा
नागपूर ः नागपूर लोकसभा मतदारसंघातील फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे लोकप्रिय उमेदवार अॅड.संतोष लांजेवार यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन सामान्य मतदारांनी केले असून त्यांच्या झंझावाती प्रचार संपल्यानंतर मतदारांनी ह्या प्रतिक्रिया दिल्या.नागपूर ही सुभाष चंद्र बोस यांच्या कार्याची पावती देणारे शहर असून जाबुवंतराव धोटे यांनी पक्षाचे नेतृत्व केले.ते नागपूरचे खासदारसुद्धा राहिले आहेत.त्यांच्या पावलावर पावले ठेऊन सामान्य कुटुंबातील अॅ़ड.संतोष लांजेवार निवडणूक लढवीत आहेत. देशातील सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, याकरिता ते आंदोलन करीत आहेत. गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी आतापर्यंत त्यांनी अनेक आंदोलन केली आणि ते यशस्वीसुद्धा झाली आहेत.महागाईमुळे जनता होळपळत असताना त्यापासून त्यांची सुटका झाली पाहिजे,असे त्यांना वाटत आहे.याकरिता त्यांना पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला असून त्यांना गोरगरीब जनतेच्या हितासाठी लढणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या १० दिवसांपासून त्यांनी नागपूर मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली.तसेच शहरातील प्रत्येक घरी जाऊन आपला जाहीरनामा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.नागपूर शहरातील अनेक समस्या सोडवून तिला स्मार्ट सिटी बनविण्याचा आपला प्रयत्न राहील,असेही त्यांना म्हटले आहे.शहरातील झोपडपट्ट्यामध्ये आजही सुविधा नाहीत. त्यामुळे त्या भागातील लोकांचे जगणे मुश्कील झाले.दहा वर्षे भाजपचा खासदार आणि मंत्री राहूनही त्यांना झोपडपट्टीमधील लोकांचे दुःख दिसले नाही.तसेच अनेक वर्षे कॉग्रेसचा खासदार राहूनही त्यांनी साधी पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही.त्यामुळे अशा पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यापेक्षा गोरगरीबांच्या दुःखाची जाणीव असलेल्या अॅड.संतोष लांजेवार यांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

संबंधित पोस्ट

आत्तापर्यंत माझा संयम पाहिला, पण…रायगडावरून संभाजीराजे कडाडले 

divyanirdhar

कसे झाले साध्य; नागपूर जिल्ह्यात १३३ गावांत शंभर टक्के लसीकरण

divyanirdhar

डी.डी. सोनटक्के, समिती प्रमुख आशीष कदम यांच्या नेतृत्त्वात धोबी समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा,६० वर्षांनंतर धोबी(परीट)महासंघाच्या लढ्याला यश

divyanirdhar

हुकुमचंद आमधरे : शेतकरी पुत्र ते शेतकरी नेता

divyanirdhar

गोसेखुर्दचे `बॅक वॉटर’ शेतशिवारात; उभी पिके आली पाण्याखाली, शेतकऱ्यांची उडाली झोप

divyanirdhar

प्रत्येकाने बुद्धाच्या तत्त्वज्ञाने पालन करणे आवश्यक : महाराष्ट्र विद्रोही चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव

divyanirdhar