Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूर

महानिर्मितीचे अंतर्गत कामे बाहेरील लोकांना देऊ नका; राष्ट्रवादी कामगार सेल जिल्हाध्यक्षांची पालकमंत्र्यांकडे मागणी

नागपूर,ः कोराडी महानिर्मितीमधील अंतर्गत कामे बाहेरील कंत्राटदारांना देऊ नका, अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस (कामगार)चे जिल्हाध्यक्ष भूषण चंद्रशेखर यांनी केली आहे. त्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील महानिर्मिती स्थापत्य-२, कोराडी विस्तारित प्रकल्प, महानिर्मिती बांधकाम व कोराडी प्रशिक्षण केंद्राअंतर्गत कामे सुरू आहेत. तीन लाखांखालील मल्टिपल इन्क्वायरी ई-निविदा प्रक्रियेत कोराडी-महादूला गावाबाहेरील कंत्राटदारांना कामे देऊ नये. ही कामे त्यांना दिल्यास स्थानिकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. याविरोधात खापरखेडा
वीज केंद्राचे मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले. त्यावर अंमलबजावणी होत आहे. कोराडी केंद्रातही स्थानिकांच कामे देण्यात यावीत. मात्र काही ठिकाणी मल्टिपल इन्क्वायरी कार्यारंभ आदेश देण्याचे जाणीवपूर्वक टाळले आहे, असेही श्री. चंद्रशेखर यांनी निवेदनात म्हटले आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील सर्व लहान कंत्राटदार, बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या निवेदनावर तत्काळ कार्यवाही करून कोराडी-महादूलावासीयांना न्याय द्यावा,अशी मागणी भूषण चंद्रशेखर यांनी केली आहे.

महानिर्मितीची लाखोंची कंत्राट कोट्यवधीची झाली. पण इन्क्वायरी कामाची मर्यादा पाच लाखांपर्यंत होण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे लहान कंत्राटदार त्रस्त आहेत.
भूषण चंद्रशेखर, जिल्हाध्यक्ष, कामगार सेल
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा)

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय विभागात अनेक अधिकारी ९ वर्षांपासून एकाच विभागात

divyanirdhar

तीन वर्ष सांभाळले, शेवटी वनविभागानेच पकडले!

divyanirdhar

राज्यात विकास करणारे नाही तर वसुली करणारे सरकार आहेः माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे टीकास्त्र

divyanirdhar

लसीकरणावर केंद्र शासनाने दीर्घ धोरण जाहीर करावे; माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुबोध मोहिते यांची मागणी

divyanirdhar

नगर भूमापनच्या शिबिरात अनेकांचे ‘समाधान; ४५२ जणांनी केले अर्ज; अनेकांचे अर्ज निकाली

divyanirdhar

खूप झाले राजकीय आरक्षण… ते बंदच झाले पाहिजे…

divyanirdhar