Divya Nirdhar
Breaking News
kavle
नागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकीयविदर्भ

शेतकरी, कामगारांचे आधारस्तंभ राजानंद कावळे आता राजोला जिल्हा परिषदेच्या मैदानात

उल्हास मेश्रामदिव्य निर्धार प्रतिनिधी

साळवा(कुही) ः नागपूर जिल्ह्यातील समाजकारणात स्वतःला झोकून देणारे व्यक्तिमत्त्व राजानंद कावळे. रात्रंदिवस त्यांनी लोकांची सेवा केली. कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदतीची हात दिला. अनेक रुग्णांना त्यांनी मदत केली. त्यामुळे सध्या ते नागपूर जिल्ह्यातील लोकांच्या गळ्यातील ताईत आहे. सध्या कुही तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक आहे. अनेकांनी त्यांना सर्कलमधून निवडणूक लढवावी, असा आग्रह केला आहे. त्यांच्यामुळे समाजसेवा करणारा व्यक्ती आपला लोकप्रतिनिधी होईल, अशी अपेक्षा आहे. त्या चर्चेने समाजमन ढवळून निघत आहे. अनेकांनी त्यांच्या विजयाबद्दलची खात्री आहे.

जिल्हा परिषद सदस्यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी एका वर्षातच पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. .२९ जूनला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यात उमेदवारांना ६ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. त्यात कुही तालुक्यातील रिक्त झालेल्या राजोला जिल्हा परिषदसह सिल्ली व तारणा पंचायत समिती यासाठी निवडणूक होत आहे. यासाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करीत असून कोरोनामुळे राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शन करू शकणार नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ४ दिवस शिल्लक असूनही केवळ राजोला जिल्हा परिषदेच्या जागेसाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. तर सिल्ली व तारणा पंचायत समिती गणासाठी अद्यापही एकही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले नाही. राजोला जिल्हा परिषद सर्कलसाठी भाजपचे बाळूभाऊ उर्फ भोजराज ठवकर यांनी आपला दावा कायम करीत नामांकन दाखल केले . राजोला जिल्हा परिषद सर्कल हे पूर्वी पासूनच भाजपकडे राहिला आहे. या सर्कलमधून पूर्वी तीन वेळा श्यामबाबू दुबे यांनी नेतृत्व केले. त्यानंतर येथे भाजपमधून बाहेर पडलेले अरुण हटवार हे काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांनी या सर्कलचे नेतृत्व केले. त्यानंतर महिला राखीव मतदार क्षेत्र झाल्यानंतर पत्नीला निवडून आणून काँग्रेसकडे हे क्षेत्र अबाधित ठेवले होते. परंतु, गेल्या वर्षीच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा हे क्षेत्र खेचून घेतले होते. मात्र दुर्दैव असे की, येथील ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याने एक वर्षानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.आता बाळूभाऊ ठवकर हे सर्कल आपल्याकडे राखणार काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागच्या वेळी काँग्रेसचे अरुण हटवार यांचा निसटता पराभव करून ते निवडून आलेले होते. यावेळेस अरुण हटवार यांना पुन्हा संधी मिळाली आहे .ते या सर्कलमध्ये बाळूभाऊ ठवकर ला मात देतील काय?अशी चर्चा मतदार क्षेत्रात होत आहे.गतवर्षी झालेल्या निवडणुकीत कुही तालुक्यात मांढळ सर्कल सोडता तिन्ही जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तर या अगोदरच्या पंचवार्षिक मध्ये कुही – तितुर जि.प.क्षेत्र सोडता इतर तिन्ही क्षेत्रात काँग्रेसचे सदस्य होते.परंतु गत वेळेस हे गणित उलट झाले होते.आता काँग्रेसला या सर्कलमध्ये निवडून येण्याची संधी मिळाली आहे. अजूनपर्यत या क्षेत्रात भाजप विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी एक होऊन लढत देणार की काय? हे अजूनतरी ठरलेले दिसत नाही.त्यामुळे पूर्वी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले आजचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हा उपाध्यक्ष पदावर असलेले भागेश्वर फेंडर हे या क्षेत्रात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.त्यांनी तशा हालचाली सुरू केलेल्या आहेत.आता महाविकास आघाडी एक होऊन भाजप ला मात देणार की काँग्रेस स्वबळावर लढणार? असा प्रश्न तालुक्यात चर्चिला जात आहे.भागेश्वर फेंडर हे जर राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले तर भाजप व काँग्रेस साठी फार मोठी डोकेदुखी ठरणार?

राजानंद कावळे यांचे सामाजिक योगदान

राजानंद कावळे हे कुही, उमरेड आणि भिवापूर तालुक्यातील शेतकरी आणि कामगार नेते आहेत. सामाजिक प्रश्न सोडविताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. कुही तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांचा चाहता वर्ग आहे. गेल्या ३० वर्षापासून ते राजकारणात कार्यरत आहेत. कॉग्रेस पक्षात असताना त्यांचा थेट राहुल गांधी यांच्यासोबत संपर्क आला. त्यांच्या सांगण्यावरून अनेकदा त्यांनी विविध राज्यात काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली. परंतु, स्थानिक जिल्हा राजकारणातील अनेकांनी त्यांचा वाढता प्रभाव पाहून त्यांना दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे ते गेल्या काही वर्षांपासून जिल्हा कॉंग्रेसवर नाराज आहेत. त्यामुळेच  त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. मात्र वरिष्ठ नेत्यांनी अजुनही त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही. दुसरीकडे या काळात त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले. प्रत्येक गावात त्यांनी काम केले. शेतकरी. कामगार याच्यासोबत थेट संपर्क साधला. वेळीअवेळी त्यांना मदतीचा हात दिला कोरोनाच्या काळात त्यांनी अनेकांना मदत केली. गावातील प्रत्येकाला मदत करण्याचे धाडस पाहून अनेकांनी त्यांच्या कामाची स्तुती केली. आजही ते प्रत्येकांची विचारपूस करून मदत करतात. त्यामुळे शेतकरी, कामगार, युवक आणि महिला वर्गामध्ये त्यांचा आदर राखला जातो.

राजोलामध्ये विजयी होण्याची शक्यता

राजोला जिल्हा परिषद सर्कलमध्ये ते मोठ्या मताने विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या अनेक वर्षापासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचा सामाजिक आणि राजकीय ताळमेळ चांगला आहे. राजकीय क्षेत्रातील त्यांचा राबत लक्षात घेता त्यांना सर्वच पक्षातून छुपी मदत होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातून ते विजयी झाल्यास लोकांना खरा समाजसेवक मिळाल्याचा आनंद होईल, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

संबंधित पोस्ट

बार्टी ः जातीचे नव्हे विकासाचे करा राजकारण

divyanirdhar

सावित्रीच्या लेकींनी जिजाऊचा घ्यावा आदर्श ःडॉ. नूपुर नेवासकर

divyanirdhar

माजी कृषींमंत्री अनिल बोंडे म्हणाले, कृषी कायदे कधी रद्द होणार नाहीत…

divyanirdhar

सरपंच दीपक राऊत यांच्या नेतृत्त्वात शेकडो गरजूंना विविध साहित्याचे वाटप

divyanirdhar

काय चालले चंद्रपुरात? गुप्तधनासाठी केली वाघाची शिकार

divyanirdhar

भटक्यांना कधी मिळणारा निवारा, सरकारकडेही नाही पैसा…

divyanirdhar