Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीय

रिपब्लिकन पक्षाचे रिद्देश्वर बेले यांना विजय करा; जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांचे मतदारांना आवाहन

नागपूर ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाचे उमेदवार रिद्देश्वर बेले यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघात झंझावती दौरा सुरू आहे. त्यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांनी प्रचारादरम्यान केला.

लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असलेल्या रिद्देश्वर बेले यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच पुढाकार घेतात. सामान्य माणसाचा विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. गोरगरिबांचा पक्ष म्हणून त्याकडे पाहिजे जात आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात दहा वर्षे शिवसेना खासदार होता.त्याला भाजपचे समर्थन होते. मात्र, दहा वर्षांच विकासाच्या नावाने बोंब सुरू आहे. गावागावांतील विकासाला चालना देण्यासाठी खासदाराची निवडणूक होते. रामटेक मतदारसंघात फक्त जातीच्या आधारावर निवडून होत असून गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार जातीच्या आधारावर निवडून आला. विकासाची संधी असताना विकास केला नाही. आता कॉंग्रेस मधून आयात केलेल्या आमदार पारवेला उमेदवारी दिली. जो पक्षाचा झाला नाही, तो जनतेचा काय होईल. उमरेडचा आमदार असताना राजू पारवे यांनी विकासचे दिवे लावले नाही. आता खासदारकी द्या विकास करतो म्हणून मताचा जोगवा मागत आहे. त्याला यावेळी जनता चांगलाच धडा शिकविणार आहे, असे दुर्वास चौधरी म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे स्वतःची विचारधारा असून त्या विचारधारेला धरून विकास साधणार आहे. गेल्या काही वर्षात वाढलेली महागाई, वाढलेला शिक्षणाचा खर्च यामुळे सामान्य माणसाच्या नाकीनऊ येत आहे. अशा स्थितीत सामान्य माणसाचे प्रश्न सोडविणाऱ्यांना निवडून द्यावे,असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांनी केले आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार रिद्देश्वर बेले यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

संबंधित पोस्ट

‘क्रांती’च्या बुद्ध भीम गीताने श्रोते मंत्रमुग्ध; सुरेशबाबू डोंगरे यांचे एकतेचे आवाहन

divyanirdhar

कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे शेतकरी अडचणी; जागोजागी बंधारे बांधल्याने नदीचे झाले नाले

divyanirdhar

डॉक्टर म्हणतात, रुग्णालयातील संपले औषध, आणा बाहेरून

divyanirdhar

राजकारणासोबतच प्रबोधनाची समाजाला गरज; अखिल तिरळे कुणबी समाज पदाधिकाऱ्यांचा चर्चासत्रात सूर

divyanirdhar

बदली रद्दच्या आदेशाने ग्रामसेवकांत नाराजी; आदेश मागे घेण्याची ग्रामसेवक संघाची मागणी

divyanirdhar

आदिवासींच्या हक्कासाठी आजन्म लढा देण्याची यांनी केली तयारी…वाचा

divyanirdhar