दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर ः दहा वर्ष खासदार राहुनही रामटेक मतदारसंघात विकासाची बोंब आहे. गावागावांत समस्यांचा महापूर असून सत्तेत असलेल्या सरकारच्या खासदाराने केले तरी काय?, असा सवाल मतदार करीत आहेत. तर आयात केलेल्या उमेदवारांना निवडून द्या, असे म्हणून मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या समस्या संसदेत मांडून विकास करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या किशोर गजभिये यांनी निवडून द्या, असे आवाहन प्रचारादरम्यान नेत्यांनी केले. किशोर गजभिये यांच्या प्रचाराचा झंझावात सर्व विक्रम मोडणार असल्याचा अंदाजही यावेळी नेत्यांनी केला.
रामटेक लोकसभा मतदारसंघात दहा वर्षे शिवसेना खासदार होता.त्याला भाजपचे समर्थन होते. मात्र, दहा वर्षांच विकासाच्या नावाने बोंब सुरू आहे. गावागावांतील विकासाला चालना देण्यासाठी खासदाराची निवडणूक होते. रामटेक मतदारसंघात फक्त जातीच्या आधारावर निवडून होत असून गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार जातीच्या आधारवर निवडून आला. विकासाची संधी असताना विकास केला नाही. आता कॉंग्रेसमधून आयात केलेल्या आमदार पारवेला उमेदवारी दिली. जो पक्षाचा झाला नाही, तो जनतेचा काय होईल. उमरेडचा आमदार असताना राजू पारवे यांनी विकासचे दिवे लावले नाही. आता खासदारकी द्या विकास करतो म्हणून मताचा जोगवा मागत आहे. त्याला यावेळी जनता चांगलाच धडा शिकविणार आहे. कॉंग्रेसनेही यावेळी उमेदवारही गावापुरता मर्यादीत असून लोकसभा त्यांचा शिवसेना भाजपच्या उमेदवाराला छुप पाठिंबा आहे. आपल्या उमेदवाराचा अर्ज रद्दबाद होईल हे माहिती असताना त्यांनी उमेदवाराचा अर्ज भरला. तसेच गेल्या वेळेस चार लाखांपेक्षा अधिक मते घेणाऱ्या उमेदवाराला जातीच्या नावाने डावलण्यात आले. त्यामुळे किशोर गजभिये यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर लोसकभा निवडणूक लढवित त्यांचा विजय होईल, अशी आशाही नेत्यांनी व्यक्ती केली.