Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

किशोर गजभिये यांना गावागावांतून प्रतिसाद; प्रचारात घेतली आघाडी

दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर ः वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किशोर गजभिये यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघात झंझावती दौरा सुरू आहे. त्यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून किशोर गजभिये ‘आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून जात आहे.
लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असलेल्या किशोर गजभिये यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची दावेदारी असताना फक्त कॉग्रेस नेत्यांच्या जातीय द्वेषातून त्यांची उमेदवारी नाकारली.विजयाचे दावेदार असलेल्या किशोर गजभिये यांच्यावरील हा अन्याय आहे. कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना किशोर गजभिये हे आपले उमेदवार हवे होते असे त्यांना वाटत असून अनेक कॉग्रेस पदाधिकाऱ्यांनी किशोर गजभिये यांनी उघडउघड पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघातून ते निवडून येतील यात शंका नाही. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला असून प्रत्येक गावात त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. वंचितचे उमदेवार म्हणून त्यांना गावागावांतील आणि प्रत्येक समाजातील आपला हक्काचा उमेदवार म्हणून समर्थन देत आहे.
नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अनेक विकासाची कामे केली. समाजासाठी लढणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. यातून सामान्य माणसांचे प्रश्न सोडवून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्यामुळे अनेक गोरगरिबांना न्याय मिळाला असून असा सामान्य माणूस त्यांच्या प्रचारासाठी गावागावांमध्ये उतरला आहे. रामटेक मतदारसंघातील अनेक गावात त्यांच्या मिरवणुकीला प्रतिसाद मिळत असून आपल्या हक्काचा माणूस लोकसभेत गेला पाहिजे म्हणून ते काम करीत आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी प्रचारासाठी रामटेकात
माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी अनेक माजी अधिकारी गावागावांत फिरत असून स्वतःच्या खर्चाने त्यांचा प्रचार करीत असल्याचे सुखद चित्र रामटेक लोकसभा मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. गावातील प्रत्येक तरुण, वृद्ध आणि महिलांना किशोर गजभिये यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या प्रचाराचा झंझावात बघता ते प्रचंड बहुमतांनी निवडून येतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

बार्टी ः जातीचे नव्हे विकासाचे करा राजकारण

divyanirdhar

अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेत मुलींची बाजी, 154 पुरस्कारांचे वितरण

divyanirdhar

चोर म्हणाला… साहेब सीसीटीव्हीच बंद आहेत!

divyanirdhar

यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही

divyanirdhar

माझ्याबाजूने मनभेद नाही, त्यांच्या बाजूचे माहीत नाही… उपसभापती नीलम गोऱ्हे

divyanirdhar

खासदार मेंढे म्हणाले, ग्रामीण भागात तयार करा रोजगार 

divyanirdhar