नागपूर ः भाजपचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड प्रकाश टेकाडे यांनी कोलमाइनमध्ये शेती गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना तातडीने नोकरी द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्यांनी कोलमाइनच्या विविध समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यावर भर दिला. शेतकऱ्यांच्या जमिनी आधी अधिग्रहीत करून मोबदला द्यावा आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात यावर चर्चा केली. त्यांच्यासोबत माजी आमदार सुधाकर कोहळे होते. बोरगाव बु. येथील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असेही ॲड. प्रकाश टेकाडे म्हणाले.