Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्या

कॉंग्रेस नेत्यांना रामटेकमध्ये बौद्धांची ‘एलर्जी’

नागपूर ः रिपब्लिकन पक्षाला संपविल्यानंतर आता कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी बौद्धांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा विडा उचलला आहे. बौद्ध नेत्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडणुकीत पाडण्याचे काम गेल्या दोन निवडणुकीमध्ये रामटेकमध्ये कॉंग्रेस नेत्यांकडून झाले आहे. आत्ता तर निवडून येत नाही त्यांना उमेदवारी न देण्याचा घाट कॉंग्रेस नेत्यांनी घातला आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तसेच या मतदारसंघातील उमरेड विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. गेल्या तीन निवडणुकीपैकी दोन निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येत असतानाही फक्त बौद्ध आहे म्हणून त्यांना पाडण्याचे काम कॉंग्रेस नेत्यांनी केले आहे. या मतदारसंघात ६ लाखांपेक्षा अधिक अनुसूचित जातीमधील मतदारांची लोकसंख्या आहे. तर यातील ५ लाख ५ हजारांवर बौद्धांचे मतदान आहे. मात्र, रिपब्लिकन पक्ष सोबत असताना उमेदवारी देऊन त्यांना पाडण्याचे काम केले. यामुळे रिपब्लिकन पक्षाची शकले झाली आणि प्रत्येक नेत्यांनी स्वतःचा पक्ष काढून तो कॉंग्रेसच्या दावणीला बांधला. एक किंवा दोन जागा देऊन त्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम न करण्याची सूचना देऊन निवडून येणाऱ्या जागा पाडण्याचे काम कॉग्रेस नेत्यांनी केले. रामटेक लोकसभा मतदारसंघात सुरुवातील मुकुल वासनिक निवडून आले. मात्र, त्यानंतर दोन लोकसभा निवडणुकीत बौद्ध उमेदवारांना पाडण्यात कॉंग्रेसने कोणतीही कसर सोडली नाही. महत्त्वाचे म्हणजे पक्षातील बौद्ध नेत्यांना उमेदवारी न देता वेळेवर दुसऱ्याच नेत्यांना उमेदवारी देऊन त्यांना पाडण्याचे काम केले. आताही तोच प्रकार कॉंग्रेस नेत्यांकडून होत आहे. रामटेकमध्ये अनेक सक्षम बौद्ध उमेदवार असताना मेणबत्ती विरुद्ध अगरबत्ती असा प्रचार करून त्यांना पाडण्याचे कामही कॉंग्रेस नेत्यांनीच केले. मतदारसंघात बौद्ध नेता तयार होऊच नये, असा प्रयत्न काही नेत्यांकडून होताना दिसून येत आहे. रामटेक लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बौद्धांना डावलण्याचे काम करण्यात आले आहे. निवडून येत नाही म्हणून बौद्धांना उमेदवारी देऊ नये, असे वरिष्ठ नेत्यांना सांगण्यात येते. भविष्यातही गल्ली बोळातून बौद्धांचे राजकारण संपविण्याचा प्रकार होईल. पण उमेदवारी दिल्यानंतर कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करतात हे मात्र, सांगण्यात विसरले आहेत.
उमरेड मतदारसंघातही तोच कित्ता गिरविण्यात आला. येथील माजी आमदार नेहमीच बौद्धांचा विचार करीत असून त्यांना तिकीट देऊ नये, यासाठी तो आग्रही आहे. त्याचा परिणाम कामठीतून त्याला एकदा हार पत्कारावी लागली. त्यानंतर तो उमरेड मतदारसंघात बौद्धांचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न सुरू केला. आता तो रामटेक विधानसभा मतदारसंघातून तयारी करीत आहे. कॉंग्रेस पक्षातील अनेक नेत्यांना
बौद्धांची एलर्जी असल्याचे दिसून येते. मात्र, लोकसंख्येने भरपूर असलेल्या समाजाला डावलण्याचे परिणाम कॉंग्रेसला भोगावे लागणार हे निश्चित.

संबंधित पोस्ट

बायको गेली माहेरी, अन् नवऱ्याचे जुळले शेजारणीची सूत… काही दिवसांत झाले हे.. वाचा

divyanirdhar

समाजातील युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

divyanirdhar

हिवाळी अधिवेशनात सावजी हॉटेलची विशेष क्रेझ

divyanirdhar

कॉंग्रेसचे दरवाढीविरोधात गोधनी येथे आंदोलन ; केंद्र सरकारचा केला निषेध

divyanirdhar

चर्मोउद्योगाच्या बाजारपेठेसाठी लिडकॉमचा पुढाकार

divyanirdhar

कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे शेतकरी अडचणी; जागोजागी बंधारे बांधल्याने नदीचे झाले नाले

divyanirdhar