Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्याराजकीय

शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०

दिव्य निर्धार ः वृत्तसेवा
नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०” म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विरोधकांच्या गळ्यात संत्री- वांग्याची माळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
महाविकास आघाडीद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवन परिसरात आज मोर्चा काढत आंदोलन केले गेले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गळ्यात संत्री, वांगी यांची माळ घालून आंदोलन केले. याप्रसंगी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर “शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय गाजर”, “शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चारसो बीस”, “विमा कंपन्या झाल्या मालामाल, शेतकरी झाला कंगाल” आणि इतरही निदर्शने केली.आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सुनील प्रभू , नाना पटोले, अनिल देशमुख, अभिजित वंजारी, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकर, अशोक चव्हाण आणि इतर विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित होते. सगळ्यांनी यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली.

संबंधित पोस्ट

श्री लेमदेव पाटील महाविद्यालयमध्ये फायर एक्स्टिंग्विशरचे प्रशिक्षण

divyanirdhar

divyanirdhar

नागपूर मनपाचा खड्ड्यांवर कोट्यवधींचा खर्च,कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे नियोजन

divyanirdhar

खैरे कुणबी समाजातील समस्यांवर सरकारही गप्पच : गुणेश्वर आरीकर यांचा सवाल ः शिक्षणातील मागासलेपणामुळे समाज गंभीर संकटात

divyanirdhar

कोरोना रुग्णाचा उपचार मोफत करा : डी.डी. सोनटक्के

divyanirdhar

शेतकरी मिशन ‘सरकार आपल्या दारी’ ; किशोर तिवारी घेणार आढावा

divyanirdhar