Divya Nirdhar
Breaking News
नागपूरराजकीयविदर्भ

आमदार समीर कुणावार म्हणाले, तिसऱ्या लाटेसाठी, “ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन” मोहीम राबविणार

दिव्यनिर्धार/ प्रतिनिधी
हिंगणघाट(वर्धा) ः कोरोना ची दुसरी लाट हळूहळू ओसरतेय. दुसरा लाटेने वर्धा जिल्हा होरपळून निघाला होता. वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्याची स्थिती मात्र आटोक्यात होती.स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने वेळीच सकारात्मक पावले उचलल्यामुळे हिंगणघाट – समुद्रपूर भागातील कोरोना नियंत्रणात आण्यात यश आलेय.हिंगणघाट – समुद्रपूर भागातील कोरोनाचा “डेथ रेशो” तसा इतर तालुक्याच्या तुलनेने कमी होता.हि किमया कशी साध्य केली ? आरोग्य प्रशासन आणि हेल्थ मॅनॅजमेण्ट सिस्टम शी समन्वय कसा होता.औषध, बेड्स, ऑक्सिजन इत्यादींचे नियोजन कसे केले. आणि तिसरा लाटेकरीता काय नियोजन आहे. आईसीएमआर आरोग्य मंत्रालय, राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संकेतावरून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता बघता हे आव्हान पेलण्यास प्रशासन कसे तत्पर आहे त्या अनुषंगाने हिंगणघाट – समुद्रपूर भागातील लोकप्रिय आमदार समीर कुणावार यांनी दिव्य निर्धार चे वरिष्ठ संपादक सुजित ठमके यांच्याशी विशेष बातचीत केली त्यातील सारांश.
हिंगणघाट ची परिस्थिती आता नियंत्रणात आहे.कोरोना च्या दुसरा लाटामुळे आरोग्य यंत्रणा. प्रशासन हतबल झाले होते.दुसरा लाटेतील मृत्युदर आणि पॉजिटीव्ह रुग्नांची संख्या अधिक होती पण हिंगणघाट समुद्रपूर भागातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आम्हाला यश आलेय.हिंगणघाट आरोग्य केंद्रात कोरोना पूर्वी केवळ २० बेड्स उपलब्ध होते. ऑक्सिजन बेड्स ची प्रचंड कमतरता होती. आम्ही तत्परतेने केंद्र आणि राज्याशी समन्वय करून ऑक्सिजन बेड्स,औषधांचा पुरवठा मंजूर करून घेतला.आता दुसरी लाट जरी ओसरली असली तरीही तिसरा लाटेची शक्यता मेडिकल सायन्स, तज्ज्ञ, केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांनी वर्तविली आहे. राज्याकडूनही अशा सूचना आला आहेत. त्यामुळे तिसरा लाटेकरीता हिंगणघाट मधील सगळी आरोग्य यंत्रणा कामाला लावली आहे. आमदार फंडातील ४० लक्ष रु. ऑक्सिजन बेड्स करिता उपलब्ध करून दिले आहेत. दुसरा लाटेवेळी १०० बेड्स ची मर्यादा होती आता २०० बेड्स वर वाढविली आहे. त्यातील २५ बेड्स लहान बाळांकरिता राखून ठेवण्यात आले आहे असे आमदार समीर कुणावार म्हणाले. तिसरा लाटेत हिंगणघाट – समुद्रपूर भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर आमदार कुणावार जोमाने कामाला लागेल आहेत. हिंगणघाट आरोग्य केंद्रातच ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला आहे. हिंगणघाट परिसरातील बालरोग तज्ञ्, नर्सेस, डॉक्टर आणि सगळी आरोग्य यंत्रणा तत्पर आहे.
ऑक्सिजन प्लांट करिता आमदार फण्डातील ६० लक्ष रु देण्यात आले आहेत. कोरोनाला हरविण्याकरिता सगळी यंत्रणा तयार आहे असल्याचे आमदार समीर कुणावार म्हणाले.
तिसरा लाटेकरीता औषधांचा मुबलक पुरवठा, ऑक्सिजन, ऍम्ब्युलन्स, विशेष कक्ष, काउंसिलिंग सेंटर इत्यादी ऍक्टिव्ह असल्याचे आ. कुणावार म्हणाले.
हिंगणघाट – समुद्रपूर परिसर सगळ्याच बाबींवर आघाडीवर आहे. मागील ७ वर्षांपासून या परिसरात आमदार फंडातून प्रचंड कामे झाले आहेत. आरोग्य यंत्रणा सुदृढ करणे सोबतच रस्ते, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वॉटर प्लान्ट निर्माण करणे, बाग बगीचे, रोजगार निर्मिती इत्यादी बाबतील सुद्धा आमच्या कार्यकाळात प्रचंड कामे झाले आहेत. गिमा टेक्सटाईल मिल्स, वेळा येथील पीपीपी मॉडेल बेस्ड नेशनल टेक्सटाईल पार्क यामुळे १५००० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. आमच्या शासन काळातील हि खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मागील ७ वर्षात या भागात रोजगार संबंधित दोन मोठे प्रोजेक्ट आले असल्याचे आमदार समीर कुणावार म्हणाले.
तिसरा लाटेला आम्ही परतवून लावू असा आशावाद आमदार कुणावार यांनी व्यक्त केलाय. तसेच हिंगणघाट – समुद्रपूर भागातील लोकांनी लस येऊन परिसराला कोरोना मुक्त करण्यात सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी मुलाखातीत व्यक्त केले. केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनामुळे हिंगणघाट – समुद्रपूर परिसरातही “ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन” हि मोहीम राबविण्यावर विचार मंथन सुरु असल्याचे आमदार कुण्णावर म्हणाले.

संबंधित पोस्ट

गडचिरोलीत साकारला “जितेंगे हम”

divyanirdhar

हुकुमचंद आमधरे : शेतकरी पुत्र ते शेतकरी नेता

divyanirdhar

बार्टीला आयएसओ ः धम्मज्योती गजभिये यांच्या कार्याला मिळाली झळाळी

divyanirdhar

भाजप केला आरोग्य सेवक, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

divyanirdhar

खासगी वाहने घेण्यास संघटनेचा विरोध ; कामगार संघटनेचे परिवहनमंत्र्यांना पत्र

divyanirdhar

राज्यातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; १५ जुलै रोजी निर्दशने

divyanirdhar