दिव्यनिर्धार/ प्रतिनिधी
नागपूर : बुटीबोरीत एकूण 9 प्रभाग आहेत. यात प्रभाग क‘मांक 6 मध्ये यावेळी जीवघेणी दुसरी लाट असतानाही रुग्णसं‘या घटली. यासंदर्भात अर्थ व नियोजन सभापती मुन्ना उर्फ अरविंद जयस्वाल यांनी घेतलेल्या पुढाकाराचा नक्कीच फायदा झाला, असे म्हणत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नगर परिषद प्रशासन, नगराध्यक्ष बबलू गौतम व सभापतींचे कौतुक केले.
आधुनिक वैद्यकीय शाखेने आज विविध विषयात प्रचंड प्रगती केली आहे. पूर्वी एकच डॉक्टर सर्व आजारांवर उपचार करायचे. आता काळ बदलला आणि विविध विषयातील तज्ज्ञ उदयास आले आहेत. त्याचा लाभ आपण नक्कीच घेतला पाहिजे. यादृष्टिने विचार करता आजार पाहून डॉक्टरांची निवड करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. बुटीबोरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी नगराध्यक्ष बबलू गौतम, उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, अर्थ व नियोजन सभापती मुन्ना जयस्वाल, नगरसेवक प्रवीण शर्मा, विनोद लोहकरे, मंदार वानखेडे, संध्या आंबटकर, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, तहसिलदार मोहन टिकले, ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे, मु‘याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, सुनीता जेऊरकर, विद्या दुधे, रेखा चटप, समीर बोरकुटे, सरफराज शेख, अर्चना नगराळे, वीणा ठाकरे, मनोज ढोके प्रामु‘याने उपस्थित होते.
कोरोनानंतर काही लोकांना म्युकरमायकोसिस नावाच्या आजाराने विळ‘यात घेतले आहे. हा आजार गंभीर आणि जीवघेणा आहे. तेव्हा कानासंबंधी त्रास असेल तर कान नाक घसा तज्ज्ञांशी भेटा. फुफ्फुसाविषयी त्रास असल्यास छातीरोग तज्ज्ञांना भेटा. ज्या संदर्भात त्रास असेल त्याचे तज्ज्ञ आपल्या नागपुरात उपलब्ध आहेत. तेव्हा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला कोरोनासह आलेल्या विविध आजारांवर मात करायची आहे, असेही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले. आयटीआयच्या इमारतीत पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी इतरही विषयावर मार्गदर्शन केले.